शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्कुल चले हम... शाळेतील 'वॉटर ब्रेक'ची होतेय 'सोशल चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:42 PM

1 / 6
देशातील काही शाळांनी आपल्या कार्यकुशलेतून आणि हटके अंदाजातून आपली वेगळी ओळख बनवली आहे. तर, या शाळा इतर शाळांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
2 / 6
आपल्या शाळेत मुलांना पाणी पिण्याची चांगली सवय लावण्याचा उपक्रम एका शाळेनं सुरू केलाय. केरळमधील या शाळेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरुय.
3 / 6
केरळच्या धर्तीवर कर्नाटक सरकारनेही शाळांमधील मुलांना ही सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
4 / 6
केरळमधील शाळांमध्ये शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी घंटा वाजवून सूचना केली जाते. वॉटर ब्रेकच्या नावानं ही संकल्पन सत्यात उतरली आहे.
5 / 6
शाळेच्या वेळात एक दिवसात तीन वेळा ही वॉटर बेल वाजवून पाणी पिण्यास बजावले जाते. कमी पाणी पिल्याने उद्भवणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
6 / 6
केरळ कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील काही शाळांमध्येही या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.
टॅग्स :SchoolशाळाWaterपाणीKeralaकेरळKarnatakकर्नाटक