शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:29 IST

1 / 11
रशियाची S-400 हवाई संरक्षण प्रणाली अर्थात एअर डिफेंस सिस्टिम, ही जगातील सर्वात प्रगत सिस्टिम मानली जाते. मात्र, युक्रेनने या अतिशय उत्कृष्ट सिस्टिमला चकमा दिला आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ले करून रशियाची 5 हवाई तळं उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, आपण 117 ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले चढवून रशियाची 40 लढाऊ विमानं उद्धवस्त केली. गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखली जात होती, असा दावाही केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, याच S-400 च्या सहाय्याने भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. मग रशियन सैन्य कुठे चुकले?
2 / 11
खरे तर, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षात भारत केवळ रशियन S-400 (सुदर्शन चक्र) वरच अवलंबून राहिला नाही. भारतीय सैनिकांनी स्वदेशी आकाश हवाई संरक्षण प्रणालीचाही वापर केला. यामुळे पाकिस्तानचे सर्व हल्ले सहज हाणून पाडता आले.
3 / 11
आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनाही या भारतीय शस्त्राची कमतरता जाणवत असणार. जिचे ट्रेलर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी संपूर्ण जगाने बघितले. जर रशियाकडेही भारताची 'आकाश' एअर डिफेन्स सिस्टिम असती, तर आज त्यांचे एवढे मोठे नुकसान झाले नसते.
4 / 11
जगानं पाहिली आकाशची ताकद - 'आकाश' चे संपूर्ण नाव आकाशतीर असे आहे. ही भारताने स्वतः तयार केलेली अर्थात स्वदेशी एअर डिफेंस सिस्टिम आहे. जगाला हिची खरी ओळख तेव्हा झाली, जेव्हा हिने पाकिस्तानने वापरलेले तुर्की मेड बाय रक्तार TB2 ड्रोन आणि चीनचे PL-15 मिसाइल क्षणात हाणून पाडले.
5 / 11
ही कमाल केवळ आकाशतीरचीच नाही, तर आकाशतीर आणि रशियन S-400 ने एका टीम प्रमाणे काम केले. यानंतर संपूर्ण जगाने बघितले की, पाकिस्तान कसा गुडघ्यावर आला. एवढेच नाही, तर पाकिस्तान एअरफोर्स झटक्यात जवळपास पाच वर्ष पिछाडीवर गेली.
6 / 11
जर S-400 आणि आकाशतीर सोबत असते तर... - रशियाकडे एस-४०० तर आहे. पण आकाशतीरसारखे घातक शस्त्र नाही, जे क्षणार्धात ड्रोन हाणून पाडू शकते. जर आकाशतीर एस-४०० सोबत असते, तर युक्रेनने फार आधीच गुडघे टेकले असते.
7 / 11
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला आवश्यक असलेली कमी-स्तरीय, उच्च-लवचिक हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या 'आकाश हवाई संरक्षण प्रणाली' सारखी मॉडेल असू शकते असे तज्ञांचे मत आहे.
8 / 11
तज्ज्ञांच्या मते, युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला ज्या लो-लेव्हल, हाई-फ्लेक्सिबल एअर डिफेन्स सिस्टिमची आवश्यकता होती, ती भारताच्या 'आकाश एअर डिफेंस सिस्टम' प्रमाणे असू शकली असती.
9 / 11
DRDO आणि ISRO ने तयार केले 'आकाश' - आकाश हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डीआरडीओ आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हे रडार, सेन्सर्स आणि कम्युनिकेशन सिस्टिमसह, रिअल टाइममध्ये हवाई धोके ओळखण्यास आणि ते त्वरित हाणून पाडण्यास सक्षम आहे.
10 / 11
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, याने ४०० हून अधिक ड्रोन, कामिकाजी ड्रोन आणि लॉइटरिंग म्युनिशन हाणून पाडले.
11 / 11
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, याने ४०० हून अधिक ड्रोन, कामिकाजी ड्रोन आणि लॉइटरिंग म्युनिशन हाणून पाडले.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानfighter jetलढाऊ विमान