पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 09:54 IST
1 / 7सध्या भारताच्या राजकारणात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च नेते आहेत. मोदींच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय घेतला जात नाही.2 / 7भाजपा या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे देशाच्या राजकारणात संघाची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते.3 / 7अशातच काही काळापासून मोदी हे ७५ वर्षांचे झाले की, राजकीय निवृत्ती घेऊ शकतात किंवा संघाचे नेतृत्व त्यांना निवृत्ती घेण्यास सांगू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.4 / 7पंतप्रधान मोदी यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली की त्यानंतर त्यांना खरंच राजकीय निवृत्ती घ्यावी लागेल का, या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.5 / 7संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या तीन दिवसीय अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, '७५ वर्षांनंतर निवृत्त व्हायलाच पाहिजे असे मी कधीही म्हटलेले नाही.'6 / 7'संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू. कुणी ८०व्या वर्षी मला शाखेत काम करायला सांगितलं तर मी करेन. निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही, तर संघाच्या कार्याशी जोडलेली आहे.'7 / 7'मी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी निवृत्तीचा निर्णय ठरवत नाही. आम्ही कधीही निवृत्त होण्यासाठी तयार आहोत, तसेच संघाला आमची गरज असेपर्यंत काम करायलाही सज्ज आहोत.'