सर्वनाश जवळ आलाय? तमिळानाडूच्या किनाऱ्यावर Doomsday Fish आढळल्याने एकच चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:43 IST
1 / 6तामिळनाडूतील पंबनजवळील समुद्रात मच्छिमारांच्या जाळ्यात एक मासा सापडला, जो भेटण्याचा अर्थ प्रलय येण्याचे संकेत देतो. सोमवारी, मच्छिमारांना हा दुर्मिळ मासा सापडला, ज्याला 'Doomsday Fish' असे म्हटलं जातं.2 / 6रविवारी रामेश्वरम मासेमारी बंदरातून मच्छीमार निघाले आणि मन्नारच्या आखाताजवळ मासे पकडल्यानंतर परतले. त्याना मासे बाजूला काढताना एक विचित्र, पातळ मासा आढळला.3 / 6या विचित्र माशाला 'डुम्सडे फिश' म्हणतात. तो सापडल्याने एक महाभयंकर घटना जवळ आली आहे किंवा त्सुनामी किंवा भूकंप सारखी गंभीर समुद्री आपत्ती जवळ आली आहे असे सूचित होते. 4 / 6हा मासा खूपच चमकदार आहे आणि त्याचे वजन अंदाजे ६ किलोग्रॅम आहे. मूळतः 'ओअर फिश' म्हणून ओळखले जाणारे हे मासे खोल पाण्यात राहतात आणि क्वचितच मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात.5 / 6हा मासा एक प्रलयकारी मासा मानला जातो कारण जेव्हा जेव्हा तो जपानी किनारपट्टीवर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला आहे किंवा किनाऱ्यावर वाहून आला तेव्हा त्याच्यासोबत भूकंप, त्सुनामी किंवा नैसर्गिक आपत्ती आली.6 / 6या माशाचे केवळ दर्शन हे विनाशाचे संकेत देते. म्हणूनच याला डूम्सडे फिश म्हणून ओळखले जाते. जपानसह अनेक देशांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर हा मासा दिसणे भूकंप किंवा इतर आपत्तीचे लक्षण मानले जाते.