शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:39 IST

1 / 8
इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी मेघालय पोलिसांनी 'ऑपरेशन हनिमून' नावाची मोहीम सुरू केली होती. यादरम्यान १२० पोलिसांनी ७ जून रोजी एकाच वेळी सात ठिकाणी छापे टाकून मारेकऱ्यांना अटक केली.
2 / 8
पोलिसांनी ३ आरोपींचे प्रोफाइल तपासले होते. सोनम तीन आरोपींसोबत दिसली होती, त्यानंतर पोलिसांचा तिच्यावरील संशय अधिकच वाढला. आज तकशी बोलताना शिलाँगचे एसपी विवेक श्याम म्हणाले की, या प्रकरणात आम्हाला अनेक सुगावे मिळाले होते. त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि ती पूर्ण केली.
3 / 8
त्यांनी सांगितले की, हत्येनंतर सोनम राज कुशवाहाला भेटली होती. सोनम तीन खुन्यांचीही भेट घेतली, जे एका स्थानिक गाईडने पाहिले होते. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गाजीपूर येथे स्वतंत्र पथके देखील पाठवण्यात आली होती. राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडल्यानंतर ३-४ दिवसांनी आम्हाला कळले की सोनम या हत्येत सहभागी आहे.
4 / 8
त्यांनी सांगितले की, राजाच्या हत्येनंतर सोनम येथून निघून प्रथम इंदूरला गेली. तिथे एका ठिकाणी राहिल्यानंतर ती तिथून गाजीपूरला निघून गेली. आमची टीम तिला घेऊन येत आहे, तिची चौकशी केल्यानंतर, ती गाजीपूरला का गेली होती ते कळेल.
5 / 8
२९ वर्षीय राजा रघुवंशी यांनी ११ मे रोजी इंदूरमध्ये सोनम (२५) सोबत लग्न केले आणि २० मे रोजी ते हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हनिमूनसाठी मेघालयला गेलेले राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २३ मे रोजी गूढ परिस्थितीत बेपत्ता झाले. त्यानंतर, २ जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात धबधब्याच्या जवळ एका खोल खड्ड्यात राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळला.
6 / 8
मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून भाडोत्री मारेकऱ्यांद्वारे तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली. या हत्येत सोनम आणि राज कुशवाहासह एकूण ५ जणांचा सहभाग होता.
7 / 8
पोलिसांनी सांगितले की, चारही आरोपींचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे आणि त्यांचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्थानिक पोलीस ठाण्यात आढळलेला नाही.
8 / 8
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनमने रविवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, तर राज कुशवाहासह चार आरोपींना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू