शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांची झाली प्रियंका गांधींची मुलगी मिराया, वडील रॉबर्ट वाड्रांनी शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:36 IST

1 / 9
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. खरंतर आज त्यांची मुलगी मिराया २० वर्षांची झाली आहे. प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या आनंदाचा अंदाज त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरून लावता येतो. प्रियांका गांधींनी तिच्या मुलीच्या बालपणीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
2 / 9
प्रियंका गांधी यांनी तिचा सध्याचा आणि लहानपणीचा फोटो शेअर करत एक संदेश लिहिला आहे. माझी खोडकर, कोणताही बहाणा न करणारी, आत्मनिर्भर आणि स्वतंत्र विचारांची माझी मुलगी आज २० वर्षांची झाली. पण माझ्यासाठी कायमच लहान राहिल.
3 / 9
दरवर्षी प्रियंका गांधी तिच्या वाढदिवशी मीरायासाठी एक सुंदर संदेश लिहितात. गेल्या वर्षीही एक थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले होते की, मुलं इतक्या लवकर का मोठी होतात?
4 / 9
प्रियंका गांधी यांनी मुलगी मिराया सध्या मालदीव्समध्ये इंस्ट्रक्टर लेव्हलचा डायव्हिंग कोर्स करत आहे. तिला अॅथलेटिक्सची आवडही आहे.
5 / 9
रॉबर्ट वाड्रा यांनी तिला सर्वात पहिले वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि काही फोटोही शेअर केले. त्यांनी मिरायाचं खुप कौतुक केलं. माझ्या सुंदर मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ते म्हणाले.
6 / 9
तू आत्मनिर्भर, हिंमत न हरणारी, सौम्य स्वभावाची आणि सर्वांची काळजी घेणारी मुलगी आहेस. तू सर्वांसोबत मैत्री आणि नातं निभावतेस. तू दररोज काही नवं शिकणं आणि तयार करण्यावर भरवसा ठेवणारी आहेस, असंही ते म्हणाले.
7 / 9
मला तुझा अभिमान आहे आणि कायम तुझ्या मदतीसाठी मी उभा आहे, असंही रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिलं आहे. याशिवाय तिच्यासाठी त्यांनी आणखीही संदेश लिहिला आहे. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या या फोटोंवरुनही ते दिसून येत आहे.
8 / 9
प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांना एक मुलगाही आहे. त्याचं नाव रेहान असं आहे. तो २१ वर्षांचा असून त्याला फोटोग्राफीची आवड आहे. तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कायम फोटो शेअर करत असतो. मिरायाप्रमाणेच तोदेखील लाईमलाईटपासून दूर आहे.
9 / 9
रेहाननंदेखील समुद्रकिनारी बसलेल्या मिरायाचा एक फोटो शेअर केला आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. रिपोर्ट्सनुसार मिराया ही देहरादूनच्या वेलहम गर्ल्स स्कूलमधून शिक्षण घेत आहे.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राSocial Mediaसोशल मीडिया