बापरे! फी मिळत नसल्याने "या" राज्यातील खासगी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 16:16 IST
1 / 10देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.2 / 10लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. तर काही राज्यांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.3 / 10कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका हा सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. बर्याच दिवसांपासून बंद असलेल्या खासगी शाळा आता आर्थिक अडचणींमुळे बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.4 / 10कर्नाटकच्या खासगी शाळा संघटनेचे अध्यक्ष शशी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांकडून फी भरली जात नसल्याने राज्यातील खासगी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 5 / 10'शिक्षक ऑनलाईन वर्गांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना किमान वेतन देण्यास आम्ही असमर्थ आहोत. सरकारकडूनही त्यांना कोणतंही समर्थन मिळालेलं नाही'6 / 10'बजेट शाळांमधील 60 टक्क्यांहून अधिक पालकांनी आपल्या मुलांची फी सध्याच्या परिस्थितीत भरलेली आहे. त्यामुळे शिक्षकांचे पैसे देणं देखील अवघड झालं आहे' असं शशी कुमार यांनी म्हटलं आहे.7 / 10राज्यामध्ये 20 हजारांहून अधिक शाळा असून त्यापैकी जवळपास 18 हजार बजेट शाळा या खासगी आहेत. या शाळा विद्यार्थ्यांच्या महिन्याच्या फीवर पूर्णपणे अवलंबून आहेत, जे बर्याच काळापासून आता बंद आहेत. 8 / 10शाळा त्यांच्या निधीवर बरेच दिवस चालत नाहीत आणि आता ऑनलाईन शिकणार्या शिक्षकांना किमान पगार देणे शक्य होत नसल्याचं देखील शशी कुमार यांनी म्हटलं आहे.9 / 10राज्यात सरकारी आदेशानंतर खासगी शाळा डिसेंबरपर्यंत बंद आहेत. तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींच्या आधारे सरकारने काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला आहे. 10 / 10कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी 'डिसेंबरच्या अखेरीस शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर आपण कोणताही निर्णय घेऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डिसेंबरनंतर आम्ही पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेऊ' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.