शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जयपूरच्या 'या' राजकुमारीनं घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 20:44 IST

1 / 7
जयपूर घराण्याची राजकुमारी दीया कुमारी हिने आपला पती नरेंद्र कुमारसोबत घटस्फोट घेतला आहे. दीया कुमारीने सर्वसामान्य व्यक्ती असलेल्या नरेंद्र कुमार यांच्याशी लग्न केले होते. दीया कुमारी हिच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला विरोध झाला होता. तरी सुद्धा दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केले होते.
2 / 7
दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार यांनी 21 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून दीया कुमारी आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. दोघांमध्ये वाद होते म्हणून त्यांनी विभक्त राहणे पसंत केले.
3 / 7
दीया कुमारीने ब्लॉगमध्ये लिहिले होते की, माझे पती सीए होते. अनुभव मिळवण्यासाठी ते एसएमएस म्युझियमच्या अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. नंतर त्यांनी स्वत:चा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केला.
4 / 7
लोकांना वाटायचे माझ्या आई-वडिलांनी मदत केली. पण तसे काही नव्हते. अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये माझी आणि त्यांची ओळख झाली. ते खूप केअरिंग होते. आमची पहिली भेट महालातच झाली. मला त्यांच्या सोबत छान वाटत होते.
5 / 7
दीया कुमारी महाराज सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक लेक. दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार यांचं एक गोत्र असल्याने राजपुतांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे दीयाच्या वडिलांना महासभेचं अध्यक्षपद सोडावे लागलं होते.
6 / 7
दीया कुमारीचे शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूल आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूलमधून झाले. नंतर ती लंडनला पुढील शिक्षणासाठी गेली होती.
7 / 7
दीया कुमारी आणि नरेंद्र कुमार यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. दीया कुमारी आपल्या कौटुंबिक सिटी पॅलेस, जयगढ किल्ला यांच्या संवर्धनाचे काम पाहते.
टॅग्स :Divorceघटस्फोट