मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 23:24 IST
1 / 12भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे केवळ देशातील नाही, तर जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी आघाडीचे नेते आहेत. सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार घेतल्यानंतर मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावतच गेला. 2 / 12देशातील अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत केवळ सोशल मीडियावरच नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी यांनी वेगळे स्थान निर्माण केले. मात्र, पंतप्रधान मोदींच्या अनेक गोष्टींवरून विरोधकांनी टीका केली. त्यांची खिल्ली उडवली. यापैकी एक गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींचे विशेष विमान. 3 / 12पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास विमान तयार करण्यात आले आहे. Air India One असे या विमानाचे नाव असून, अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता यासह अनेक वैशिष्ट्य या विमानाची आहेत. इतकेच नव्हे, तर एअर इंडिया वन या विमानाला आकाशातील बाहुबली असेही म्हटले जाते. पंतप्रधान मोदींच्या केवळ एका तासाच्या विमान प्रवासासाठी नेमका किती खर्च येतो, हे तुम्हाला माहिती का, ते जाणून घ्या...4 / 12पंतप्रधान मोदी यांचे Air India One एयरक्राफ्ट हवेत अभेद्य करण्यात आले आहे. या विमानाला क्षेपणास्त्रही काहीच नुकसान पोहोचू शकत नाहीत. या विमानाच्या अडवॉन्स्ड कम्यूनिकेशन सिस्टमला कोणीही हॅक करू शकत नाही. यामध्ये मिड एअर मध्ये ऑडियो आणि व्हिडिओ कम्यूनिकेशन केले जाऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत विमानातील पायलट क्षेपणास्त्रवर हल्ला करू शकतो.5 / 12Air India One हे विमानातून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती यांच्यासारख्या व्हीव्हीआयपी प्रवास करतात. हे विमानात आकाशात सुमारे ९०० किमी प्रति तासाच्या वेगाने उड्डाण करते. एअर इंडिया वन विमान १७ तास न थांबता सलगपणे हवेत उड्डाण करू शकते. या विमानात हवेत इंधन भरण्याची सुविधा असल्यामुळे हे विमान जमिनीवर उतरवण्याची गरज भासत नाही, असे एका रिपोर्टनुसार सांगितले जात आहे. 6 / 12भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्यासारख्या व्हीआयपीसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये एअर इंडिया वन Air India One विमानाला खरेदी करून भारतात आणले गेले आहे. हे जगातील सर्वात सुरक्षित विमान आहे. जे अडचणीच्या वेळी आपल्या शत्रूंवर हल्ला करू शकते. 7 / 12तसेच हे कोणत्याही हवाई हल्ल्याला झेलू शकते. या विमानात बसल्यानंतर राजेशाही वाड्यात बसल्याचा फील येतो. आतील इंटिरियर खूपच सुंदर व मोहन बनवण्यात आले आहेत. तसेच हे कठीण वेळी तितकेच हल्ला करण्यात सक्षम सुद्धा आहे.8 / 12Air India One या विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात महाग विमानापैकी एक आहे. याची किंमत ४ हजार २२९ कोटी रुपये आहे. या विमानाच्या सुरक्षेसाठी ५०० कोटी रुपये करण्यात आले आहेत. या विमानाचे इलेक्ट्रोनिक वॉरफेयर जॅमर शत्रूच्या जीपीएस आणि ड्रोन सिग्नलला ब्लॉक करू शकतात.9 / 12Air India One हे विमान डायरेक्शन इंफ्रारेड काउंटर मेजर सिस्टम दिले आहे. या विमानाला क्षेपणास्त्र आणि इंफ्रारेड मिसाइलपासून सुरक्षित ठेवते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाच्या एअर फोर्स वन विमानावर एका तासासाठी १,८१,००० डॉलर खर्च येतो.10 / 12पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका तासाच्या विमानाच्या खर्चासाठी सर्व सोयी, सुविधा मिळून किती खर्च येतो, यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाच्या एअर फोर्स वन विमानावर जेवढा खर्च होतो, तेवढाच खर्च पंतप्रधान मोदींच्या विमान खर्चावर येतो. 11 / 12Air India One ला 'एयरफोर्स वन' सारखे बनवले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या १ तासाच्या हवाई प्रवासाचा खर्च भारतीय चलनानुसार, १ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 12 / 12Air India One विमानातून जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणारा खर्च हा केवळ एकट्यापुरता नसून, या विमानातून जे व्हीआयपी व्यक्ती प्रवास करतील. त्यांच्या प्रवासावर हा खर्च केला जातो. त्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचाही समावेश आहे. एनबीटीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.