शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्लाझ्मा थेरेपीनं कोरोना रुग्णांच्या अडचणी वाढवल्या, मृत्यूही वाढले; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 18:13 IST

1 / 9
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीसाठी प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy For Covid ) नेमकी कितपत प्रभावी आहे यावरुन वाद-विवाद आजही कायम आहे. यातच एक नव्या अहवालानं प्लाझ्मा थेरपीला पुन्हा एका एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. प्लाझ्मा थेरेपीनं कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, याउलट या थेरेपीचे गंभीर परिणाम समोर आले आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
2 / 9
प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोरोना संक्रमणातून मुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा नव्यानं लागण झालेल्या रुग्णाला दिला जातो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसोबतच प्लाझ्माची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण आता कॅनडातील एका अहवालानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कॅनडातील नेचर जनरलही याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
3 / 9
रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांसाठीच्या प्लाझ्मा थेरेपीबाबत केल्या गेलेल्या अभ्यासात एकूण ९४० रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. ज्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते अशाच रुग्णांचा यात समावेश केला गेला.
4 / 9
प्लाझ्मा थेरेपी घेतलेल्या एकूण रुग्णांपैकी ३३.४ टक्के रुग्णांना गंभीर स्वरुपाच्या अडचणींचा सामना करावा लागला. यात ऑक्सिसनचं प्रमाण कमी होणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशा लक्षणांचा समावेश होता. तर प्लाझ्मा थेरेपी न घेतलेल्या रुग्णांमध्ये केवळ २६.४ टक्के रुग्णांनाच अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला.
5 / 9
जवळपास ३० दिवस चाललेल्या या अभ्यासात ज्यांनी प्लाझ्मा थेरेपी घेतली होती अशा रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील अधिक असल्याचं दिसून आलं. तर प्लाझ्मा थेरेपी न घेतलेल्यांचा मृत्यूचा आकडा कमी होता.
6 / 9
कोरोनानं मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी जवळपास सर्वच रुग्णांना कोरोना विषाणूचं निदान झाल्यानंतर प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली होती. प्लाझ्मा थेरेपीवर संशयाचं सावट आल्यानंतर राष्ट्रीय प्रोटोकॉलमधून या थेरेपीला काढून टाकण्यात आलं होतं. असं असतानाही दिल्लीत याचा वापर केला गेला. दिल्ली सरकारनं यासाठी प्लाझ्मा बँक देखील तयार केले होते
7 / 9
देशातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली होती. पण याच्या परिणामांबाबत सवाल उपस्थित केले गेल्यानंतर दुसऱ्या लाटेत प्लाझ्मा थेरेपीचा वापर अनेक रुग्णालयांनी बंद केला होता.
8 / 9
आयसीएमआरनं देखील गेल्या वर्षी प्लाझ्मा थेरेपीवर एक अभ्यास केला होता. यात प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोनानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण काही कमी होत नसल्याचं दिसून आलं होतं. देशातील एकूण ३९ शहरांमध्ये ४०० रुग्णांच्या बाबतीत याचा अभ्यास करण्यात आला होता.
9 / 9
प्लाझ्मा थेरेपीबाबतच्या या नव्या अहवालामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे. प्लाझ्मा थेरेपीवरुन वैद्यकीय संस्थांमध्येही वाद-विवाद आहेत. कोरोना विरोधात लढण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी एक शस्त्र म्हणून वापरण्यात आली होती. अनेक राज्यांनी प्लाझ्मा दान करण्याची शिबीरं आणि आवाहन देखील केलं होतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBlood Bankरक्तपेढी