शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:51 IST

1 / 8
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आज राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या राम दरबाराची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या राम दरबाराचे फोटोही समोर आले आहेत.
2 / 8
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये आज पहिल्यांदा राम दरबाराचं दर्शन झालं. या राम मंदिरातील राम दरबारासह सात मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना आज संपन्न झाली. त्यामुळे आता अयोध्येत येणाऱ्या भाविकांना आता रामललांसह राम दरबाराचंही दर्शन होणार आहे.
3 / 8
आज ५ जून रोजी अभिजीत मुहुर्त आणि स्थिर लग्नामध्ये राम दरबारासह मंदिर परिसरातील सात इतर मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अयोध्या आणि काशीमधील १०१ आचार्यांनी वैदिक मंत्रांसह धार्मिक अनुष्ठान केले.
4 / 8
या सोहळ्यासाठी मंदिर परिसराला भव्य रूपात सजवण्यात आलं होतं. तसेच संपूर्ण वातावरण हे वैदिक उर्जेने प्रफुल्लित झालेलं आहे. सकाळी ६.३० वाजता यज्ञ मंडपामध्ये सर्व आचार्याच्या प्रवेशासह अनुष्ठानास सुरुवात झाली. ज्या आठ मूर्तींनी काल शय्याधिवास करवण्यात आला होता, त्यांना सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास चेतन अवस्थेत आणण्यात आले.
5 / 8
श्रीराम जन्मभूमीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या राजदरबारामध्ये आज श्रीराम विराजमान झाले. पहिल्या मजल्याचं काम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये राम दरबार स्थापपन करण्यात आला आहे. तसेच त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
6 / 8
पहिल्या मजल्यासह मंदिराच्या मुख्य कळसाचं काम पूर्ण झालं आहे. राम जन्मभूमीचं हे मुख्य शिखर सुवर्णजडित आहे. त्याचीही विधिवत स्थापना आणि पूजन करण्यात आलं. अशा प्रकारे राम मंदिराचं बांधकाम आता पूर्ण झालं आहे.
7 / 8
आज राम मंदिरामध्ये २१ मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याबरोबरच ईशान्य कोपऱ्यामध्ये शिवलिंग, अग्निकोनामध्ये श्रीगणेश, दक्षिण मध्य भागात महाबली हनुमान, नैऋत्य दिशेला सूर्यदेवता, वायव्येला माता भगवती, उत्तर मध्यमध्ये माता अन्नपूर्णा, मुख्य मंदिरातील पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार, तर दक्षिण पश्चिमेला शेषावतार मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
8 / 8
अयोध्येमधील राम जन्मभूमी येथील राम मंदिराचं काम पूर्ण झालं आहे. सुवर्णजडित कळस आणि परिसरातील इतर मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठापनेसोबत मंदिराचं काम पूर्ण झालं आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश