By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:57 IST
1 / 13उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीची एंट्री, उत्साह अन् नमस्कार भावमुद्रा2 / 13मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हे पहिलच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यांनीही मोठ्या उत्साहात अधिवेशनाला हजेरी लावली3 / 13महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे आमदारांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच याची उत्सुकता लागली आहे.4 / 13विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले, त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली5 / 13विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केले.6 / 13सरकारने सर्वच आमदारांसाठी चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी एकत्र आलेले काँग्रेस आमदार आणि मंत्री अमित देशमुख7 / 13आमदार भाई जगताप यांनी नेमका काय जोक केला असेल, की सगळेच हसायला लागलेत8 / 13नवाब मलिक अमित देशमुख यांना काय बरं समजावून सांगत असतील?9 / 13राष्ट्रवादीचं घड्याळ काँग्रेसच्या हातात, काय म्हणता...!10 / 13देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. 11 / 13गेल्या काही दिवसांत राज्यात वाढलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. 12 / 13उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.13 / 13विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारचा निषेध नोंदवला, तसेच सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची फलकबाजीही केली