शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तेजप्रताप यादवांच्या नव्या लूकची रंगली चर्चा, वृंदावनमधील फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 15:29 IST

1 / 8
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात.
2 / 8
तेजप्रताप यादव हे राजकारणासह अध्यात्म आणि पूजा पाठ यावर विश्वास ठेवतात. याची झलक पुन्हा एकदा दिसून आली आहे. २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेजप्रताप यादव हे आपल्या मित्रांसह वृंदावनमध्ये फिरत आहेत.
3 / 8
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यादव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, यामध्ये ते वृंदावनच्या रस्त्यावर एका वेगळ्या शैलीत फिरताना दिसत आहेत.
4 / 8
तेजप्रताप यादव यांनी आपल्या या फोटोंना कॅप्शन दिली आहे. त्यात वृंदावनच्या परिसरात आरजेडीच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांसमवेत असल्याचे म्हटले आहे.
5 / 8
या फोटोंमध्ये तेज प्रताप यादव यांनी कुर्ता-धोती परिधान केल्याचे दिसत आहे, तर त्याच्यासोबत चालणारे सहकारी सुद्धआ पूर्णपणे अध्यात्मिक पोशाखात दिसत आहेत.
6 / 8
वृंदावनमध्ये तेजप्रताप यादव गायींसोबत वेळ घालवून, त्यांना खायला घालताना दिसत आहेत. दरम्यान, तेजप्रताप यादव हे नेहमी वृंदावनला भेट देतात. तसेच, ते कृष्णासोबत ते भगवान शिवांचे भक्त आहेत. त्यांच्या बासरी वाजवणाच्या कलेवरही लोकांचा विश्वास आहे.
7 / 8
तेजप्रताप यादव यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तसेच, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे फोटो शेअर होत आहेत.
8 / 8
आतापर्यंत 32000 हून अधिक लोकांनी फेसबुकवर तेजप्रताप यादव यांच्या फोटोंना लाइक केले आहे. तसेच, शेअरही करत आहेत. तेजप्रताप यादव यांचे सोशल मीडियावर मोठे फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवSocial Mediaसोशल मीडिया