रेल्वे प्रवासात गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मिळते ५० टक्के सूट; प्रवासादरम्यान ही कागदपत्रे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:41 IST
1 / 6भारतीय रेल्वेतर्फे स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, अर्जुन, पद्म, नोबेल, मॅगसेसे, वीरचक्र पुरस्कार विजेत्यांसोबतच काही विशिष्ट गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना व त्यांच्या एका सोबत्याला रेल्वे प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतीसाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. त्यानंतरच सवलत मिळू शकते.2 / 6कर्क रोग, क्षयरोग (टीबी), एड्स, कृष्ठरोग, थैलेसेमिया, हृदयविकार, किडनी, हिमोफेलिया या आजारांच्या रुग्णांना व त्यांच्यासोबत एकाला रेल्वेच्या सर्व दर्जाच्या प्रवासात सवलत मिळते.3 / 6ही सवलत प्राप्त करण्यासाठी संदर्भसेवा रुग्णालय किंवा तत्सम रुग्णालय, कर्करुग्णासाठी कर्क रुग्णालयाचे प्रमाणपत्र. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे रुग्णालयाचा दाखला आवश्यक आहे. आरक्षण करतेवेळी रुग्णाची आजाराबाबतची रुग्णालयाचे प्रमाणपत्र कागदपत्रे व सोबत्याची कागदपत्रे देणे गरजेचे असून, प्रवासात सर्व दस्ताऐवज सोबत ठेवणे आवश्यक आहे.4 / 6कर्कग्रस्त रुग्णाला एसी फर्स्ट, एसी सेकंड क्लासमध्ये ५० टक्के सवलत मिळते, तर एसी श्री टायर, स्लीपर क्लासमध्ये शंभर टक्के सवलत असते. तर रुग्णासोबत प्रवास करणाऱ्यास स्लीपर व एसीमध्ये ५० टक्के सवलत मिळते. एड्स रुग्णाला द्वितीय श्रेणीमध्ये ५० टक्के सवलत असते. 5 / 6क्षयरोग, कृष्ठरोगग्रस्त रुग्णाला व त्याच्यासोबत ज्याला स्लीपर श्रेणीमध्ये ७५ टक्के सवलत असते. थैलेसेमिया रुग्णाला व सोबत प्रवास करणाऱ्यास ५० टक्के सवलत मिळते. अॅनिमियाग्रस्त रुग्णांना सर्व प्रकारच्या गाड्यात ५० टक्के सवलत मिळते. हृदय शास्त्रक्रिया, किडनी आजार रुग्णाला व सोबतीला ५० टक्के सवलत मिळते.6 / 6खोटे दस्तऐवज बनवून प्रवास करताना आढळल्यास रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४२ नुसार तीन महिने तुरुंगवास, पाचशे रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. भारतीय दंड संहिता कलम ४२० नुसार सात वर्षे कारावास आणि दंड होऊ शकतो. फसवणुकीत वापरलेले तिकीट जप्त करण्यात येते.