शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:02 IST

1 / 10
जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्याबाबत नवा खुलासा समोर आला आहे. एनआयए सूत्रांनुसार, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी फारूख अहमदचे नाव उघड झाले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्ये ओवरग्राऊंड नेटवर्क तयार करण्याचं काम फारूख अहमदने केले. त्याने हल्ल्यात सहभागी असणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची मदत केली.
2 / 10
फारूख अहमद लश्करचा टॉप कमांडर असून तो पाकव्याप्त काश्मीरात लपून बसला आहे. मागील २ वर्षात या दहशतवाद्याने ओवरग्राऊंड वर्करच्या मदतीने अनेक दहशतवादी हल्ले घडवले आहेत. त्यातील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर केला आहे.
3 / 10
पाकिस्तानातील ३ सेक्टरमधून दहशतवादी काश्मीरात घुसखोरी करतात. फारूखला काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागातील प्रत्येक रस्त्याची खूप चांगल्यारितीने माहिती आहे. कुपवाडा येथे राहणाऱ्या या दहशतवाद्याचे घर अलीकडेच सुरक्षा दलाच्या जवानांनी उद्ध्वस्त केले आहे.
4 / 10
१९९० ते २०१६ पर्यंत फारूख सातत्याने पाकिस्तान आणि भारतात येत जात राहिला. पहलगाम हल्ल्यानंतर फारूख अहमदचे अनेक साथीदार ताब्यात घेतलेत. २ वर्षापासून तो सिक्योर्ड APP च्या माध्यमातून पाकिस्तानात बसून त्याच्या नेटवर्कमधील लोकांशी संवाद साधत होता. तपास यंत्रणांनी फारूख अहमदची डिटेल तपासले असता अनेक गोष्टी समोर आल्या.
5 / 10
जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. हे पर्यटक पहलगामच्या बैसारन खोऱ्यात फिरायला आले होते. तिथे दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला त्यात बहुतांश हिंदू होते.
6 / 10
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतलेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे.
7 / 10
भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी आहे असा दावा पाकिस्तानी मंत्री अताउल्लाह तरार यांनी केला आहे.
8 / 10
पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानात हायअलर्ट असून देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले आहे.
9 / 10
मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
10 / 10
या बैठकीतच दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याची पद्धत, लक्ष्य व वेळ निवडण्याचे सशस्त्र दलांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय, पंतप्रधानांचा कठोर पवित्रा पाहता, भारताकडून पाकला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी शक्यता आहे.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर