शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक चूक अन् ३० जणांनी गमावले प्राण; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागील धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:24 IST

1 / 8
कुंभमेळा म्हणजे श्रद्धेचा महासागर. मात्र, पुरेसे व्यवस्थापन न केल्यामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो अनेकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
2 / 8
हरिद्वारमध्ये १४ एप्रिल १९८६ रोजी झालेल्या कुंभ पर्वस्नानातही असाच हृदयद्रावक प्रकार घडला होता. त्या दिवशी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहादूर सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन डझनांहून अधिक खासदार स्नानासाठी आले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हर की पौडी येथे सामान्य भाविकांना रोखण्यात आले. त्यामुळे गर्दी प्रचंड झाली आणि भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. 
3 / 8
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी वासुदेव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मुख्य स्नान पर्वाच्या दिवशी व्हीआयपींना प्रवेश न देण्याची स्पष्ट शिफारस केली होती. मात्र, प्रशासनाने ती शिफारस धुडकावली आणि त्याच हलगर्जीपणाचा फटका या महाकुंभात पुन्हा बसला आहे.  
4 / 8
माजी पोलिस महासंचालक विभूती नारायण राय म्हणाले की, १२ ते १५ किलोमीटर चालत लाखो भाविक संगमावर पोहोचले होते. तिथे आधीच प्रचंड गर्दी होती. प्रशासनाने त्यांना दुसऱ्या घाटांकडे वळवायला हवे होते. पण तसे झाले नाही. सरकारी हलगर्जीपणा, व्हीआयपी संस्कृतीला दिले जाणारे अवास्तव प्राधान्य यामुळेच सामान्य भाविकांना आपला जीव गमवावा लागला.
5 / 8
ही घटना धक्कादायक आहे. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या अपुऱ्या सुविधा, व्हीआयपींकडे सरकारचे असलेले लक्ष, व्यवस्थापनातील अपयश या गोष्टींमुळे ही दुर्घटना घडली आहे. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस 
6 / 8
महाकुंभ मेळ्याचे व्यवस्थापन तातडीने सैन्याकडे सोपविण्यात आले पाहिजे. अन्य ठिकाणांहून आलेले लाखो भाविक प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक तास अडकून पडले आहेत.- अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष
7 / 8
महाकुंभ मेळ्यामध्ये झालेली प्रचंड गर्दी व या भाविकांसाठी केलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळेच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून सरकारने अतिशय काळजी घेणे व काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
8 / 8
मोठ्या कार्यक्रमात अशा छोट्या-मोठ्या घटना होत असतात. भाविकांनी जिथे मिळेल तिथे स्नान करणे आवश्यक आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत.- डॉ. संजय निषाद, मंत्री, यूपी
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेश