शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:21 IST

1 / 5
सध्या नवरात्रौत्सव सुरू आहे. तर दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर भारतीय रेल्वेने तिकीट बुकींगच्या नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. तुम्हीही दिवाळीत गावी जाण्याचा विचार करत असाल तर हा नियम जाणून घेणं आवश्यक आहे. आधी हा नियम केवळ तात्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी लागू होता. मात्र आता हा नियम १ ऑक्टोबरपासून जनरल रिझर्व्हेशन तिकिटावर लागू होणार आहे.
2 / 5
दरम्यान, रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये होणारी गडबड रोखण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२५ पासून नियमामधील हा बदल लागू होणार आहे. नव्या नियमानुसार ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं आहे, अशाच लोकांना रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांमध्ये तिकीट बुक करता येणार आहे.
3 / 5
रिझर्व्हेशन तिकिटाचा हा नियम आयआरसीटीसीची वेबसाईट आणि इतर अॅपवर लागू होणार आहे. तर संगणकीकृत पीआरएस काऊंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्यांसाठी वेळेची ही प्रोसेस आधीप्रमाणेच लागू राहणार आहे.
4 / 5
१ ऑक्टोबरपासून आधार व्हेरिफाईड अकाऊंटला प्राधान्य दिलं जाईल. त्यानुसार पहिल्या १५ मिनिटांपर्यंत व्हेरिफाईड आधार अकाऊंट सोडून इतर अकाऊंटनां बुकिंगची परवानगी मिळणार नाही.
5 / 5
या नियमाचा मुख्य हेतू तिकीटांची दलाली करणाऱ्यांवर अंकुश लावणे आणि तिटीक व्हेरिफाईड युझर्सपर्यंत पोहोचवणे हा आहे. ऑथेंटिफिकेशन युझर्सपर्यंतच ऑनलाईन बुकींग मर्यादित करून रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी