शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे तर मुन्नाभाईचं हॉस्पिटल… मोदींच्या फोटोंवर काँग्रेस, नेटिझन्सची टीका; लष्कराकडून कडक प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:23 PM

1 / 14
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट देऊन भारतीय जवानांचं धाडसाचं कौतुक केलं आणि चीनला सज्जड इशारा दिला.
2 / 14
गलवान खोऱ्यात भारतमातेच्या शत्रूंनी तुमच्यातील आग आणि संताप पाहिला आहे, आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्हाला कुणी दुबळं समजू नये, अशा शब्दांत त्यांनी भारतीय लष्कराचा मनोधैर्य वाढवलं.
3 / 14
मोदींनी निमू या सीमेवरील ठाण्याला भेट दिली. त्यानंतर लष्कराच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते लष्कर, हवाई दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले.
4 / 14
गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या जवानांची मोदींनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
5 / 14
पंतप्रधानांच्या या 'सरप्राईज व्हिजिट'चं एकीकडे भरभरून कौतुक होत असतानाच, काँग्रेसचे काही नेते आणि टीकाकारांनी या हॉस्पिटलभेटीवरून मोदींना लक्ष्य केलं. ट्विटरवर #MunnabhaiMBBS हा हॅशटॅग ट्रेंड झाला.
6 / 14
कुठल्याही रुग्णाला बँडेज नाही, सलाईन नाही, ऑक्सिजन सिलेंडर नाही की कुठली औषधंही नाहीत, हे तर मुन्नाभाईमधलंच हॉस्पिटल आहे, अशी खिल्ली उडवण्यात आली.
7 / 14
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक दत्त यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
8 / 14
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.
9 / 14
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.
10 / 14
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.
11 / 14
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.
12 / 14
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.
13 / 14
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, मोदींवर आणि अप्रत्यक्षपणे लष्कराच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होत असलेले आरोप अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची चपराक त्यांनी लगावली आहे.
14 / 14
कोरोना संकटाच्या काळात लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालयात करण्यात आलंय. गलवान खोऱ्यात शत्रूशी लढताना जखमी झालेल्या जवानांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या हॉस्पिटलवर आणि जवनांना दिल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटवर जी टिप्पणी झाली, ती खेदजनक आहे, असं लष्कराने नमूद केलंय.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानcongressकाँग्रेस