ना काटेरी तारांचा पहारा, ना दहशत, अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोकळेपणाने साजरा झाला स्वातंत्र्य दिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 20:44 IST
1 / 10देशभरात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर काश्मीरमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे यापूर्वी लोकांच्या व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. 2 / 10श्रीनगरमध्ये १५ लाख रहिवाशांसाठी आजचा स्वातंत्र्य दिन आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. कारण त्यांना कुठेही काटेरी तारांचा पहारा दिसला नाही. 3 / 10एकेकाळी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लाक चौकाजवळ पर्यटकांनी तिरंग्यासोबत एक फोटो काढला. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी येथे कडेकोट बंदोबस्त असतो. 4 / 10स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काश्मीरमधील लाल चौक नेहमी तिरंग्याच्या रोषणाईने झळाळून गेला होता. 5 / 10तब्बल दोन दशकांच्या काळानंतर हजारो काश्मीरी नागरिक बक्षी स्टेडियममध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.6 / 10स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आदिब हुसेन या तरुणाने सांगितले की, कुठलेही निर्बंध असल्याच आम्हाला आनंद आहे. कुठल्याही विशेष पासशिवाय प्रवेश देण्यात आला.7 / 10 शहरामध्ये अनेश शाळा ध्वजारोहणासाठी सकाळी उघडण्यात आल्या. तर दुकानेसुद्धा उघडली होती. 8 / 10अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पुरेसे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. 9 / 10तसेच प्रदेशातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा यावेळीही अबाधित ठेवण्यात आली होती. याआधी येथील सेवा ह्या १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी बंद ठेवल्या जात असत. 10 / 10तसेच प्रदेशातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा यावेळीही अबाधित ठेवण्यात आली होती. याआधी येथील सेवा ह्या १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी बंद ठेवल्या जात असत.