शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:35 IST

1 / 10
मंडी शहर आणि जिल्ह्यात पावसाचे तांडव बघायला मिळाले. शहरात ढगफुटी झाल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली. पाण्यासोबत वाहून आलेल्या गाळ अनेक घरांमध्ये शिरला. रस्त्यावर उभी असलेली वाहने गाळाखाली दबली गेली. (Mandi Cloud Burst News)
2 / 10
हिमाचल प्रदेशातील मंडी शहर जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत असून, काही दिवसांपूर्वीच भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. शहर आणि जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे.
3 / 10
मंडी शहरातील जेल रोड भागात तीन लोक पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले. त्यांचे मृतदेह एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ सापडले. तर एक जण बेपत्ता आहे.
4 / 10
मृतांमध्ये महिला, तिचा मुलगा आणि दीर यांचा समावेश आहे. पाण्यात वाहून गेल्यानंतर त्यांचे मृतदेह चिखलात दबलेल्या गाड्यांच्या मध्ये अडकलेले होते. ते एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले. महिलेचा पती जखमी झाला आहे.
5 / 10
ढगफुटीमुळे अचानक पाण्याचा जोर वाढला. त्याच्याबरोबर मातीही मोठ्याप्रमाणात वाहून आली. अनेक घरांची दारे चिखलामुळे बंद झाली. त्या घरात अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढले गेले.
6 / 10
मंडी शहरात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते चिखल-मातीने दबले गेले आहेत. चारचाकी, दुचाकी वाहने गाळात फसली. शहरातील या भयावह स्थितीची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत.
7 / 10
मंडी शहरातील जेल रोड, झोनल रुग्णालय आणि सैन मोहल्ला या भागात बुधवारी पहाटे ३ वाजता ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. अनेक घरे-दुकानांमध्ये पाणी भरले गेले.
8 / 10
पावसाचा जोर आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका होता की, लोकांनी घाबरून घरे सोडली आणि उंचीवर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेतला. मंडीमधील जेल रोड भागात सर्वाधिक जीवित आणि वित्त हानी झाली आहे.
9 / 10
ढगफुटीनंतर निर्माण झालेल्या परिस्थिती प्रशासनाला मिळताच मदत आणि शोध कार्य हाती घेण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान यांना पाचारण करण्यात आले.
10 / 10
काही दिवसांपूर्वी मंडी शहर आणि जिल्ह्यात ११ ठिकाणी ढगफुटी झाली होती. त्यानंतर पुन्हा ढगफुटी झाल्याने शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
टॅग्स :floodपूरHimachal Pradeshहिमाचल प्रदेशDeathमृत्यूRainपाऊसlandslidesभूस्खलन