1 / 8टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी महिनाभरापूर्वीच जर्मनीत जात भारताच्या माजी खासदारासोबत लग्न केले आहे. एकीकडे देशात ऑपरेशन सिंदूरची प्लॅनिंग सुरु होती, पाकिस्तानचा बदला घेण्याची भावना प्रत्येक भारतीयामध्ये होती, त्यावेळीच महुआ यांनी गुपचूप लग्न उरकले. ज्या वकिलाने कॅश फॉर क्वेरी आणि महुआंच्या लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याविरोधात केस लढविली त्याच्याशीच महुआ यांनी लग्न केले आहे. 2 / 8महुआ यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्या दोन-तीन रिलेशनशीपमध्ये देखील होत्या. यापैकीच एका उद्योगपतीने महुआ यांना लोकसभेत अडचणीत आणले होते. महुआ यांनी दर्शन हिरानंदानी यांना लोकसभेच्या अकाऊंटचा पासवर्ड अनेकदा शेअर केला होता. त्यावरून त्या लोकसभेत प्रश्न अपलोड करून घ्यायच्या आणि विचारायच्या. या प्रकरणात संसदेच्या शिस्तभंग समितीने महुआ यांना दोषी मानले होते.3 / 8याचवेळी महुआ या बीजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांच्या जास्त संपर्कात आल्या. तसे पाहता महुआ या २०१९ मध्ये लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. तेव्हा पिनाकी मिश्रा देखील खासदार होते. परंतू, तेव्हा मोईत्रा या हिरानंदानी सोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. नंतरचा घटनाक्रम मोईत्रा आणि मिश्रांना जवळ घेऊन आला आहे. 4 / 8पिनाकी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर १९९६ मध्ये लोकसभा लढविली होती. यानंतर ते बिजू जनता दलात गेले व २००९ मध्ये पुन्हा खासदार झाले. यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. २०१९ ला भाजपच्या संबित पात्रा यांना देखील त्यांनी धुळ चारली होती. परंतू, २०२४ ला त्यांचे तिकीट कापले गेले. 5 / 8२०२४ मध्ये नवीन पटनायक यांनी पिनाकी यांचे तिकीट कापले आणि त्यांच्याजागी अरुप पटनायक यांना उमेदवार बनविले. तिथेच पुरीची जागा बीजेडीने गमावली होती. ही जागा भाजपाकडे गेली आणि संबित पात्रा खासदार झाले. 6 / 8राजकारणात येण्यापूर्वी पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयाचे वकील होते. दिल्लीच्या विश्वविद्यालयातून त्यांनी कायद्याचा अभास केला आहे. कायदा आणि संविधानावरील अभ्यास यामुळे त्यांची खासदारकीची कारकीर्द गाजलेली आहे. महत्वाच्या चर्चांत त्यांचा सहभाग असायचा. 7 / 8गेल्या दोन वर्षांत महुआ यांना प्रेमात धोका मिळाला आणि जेव्हा खासदारकी धोक्यात आली तेव्हा पिनाकी यांनी अनेकदा त्यांची केस लढविली. इथेच हे दोघे जास्त संपर्कात आले आणि अखेर विवाहबंधनात अडकले. 8 / 8पिनाकी मिश्रा यांची पहिली पत्नी संगिता मिश्रा यांचे १९८४ ला पहिले लग्न झाले होते. संगिता यांच्यापासून पिनाकी यांना दोन मुले आहेत. पिनाकी आणि महुआ या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. महुआ ५० वर्षांच्या आहेत तर त्यांचे दुसरे पती पिनाकी मिश्रा ६५ वर्षांचे आहेत.