शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahakumbh 2025: नितीन गडकरींचे कुटुंबासोबत संगमात स्नान; म्हणाले, "गंगा मातेचे सर्वांना आशीर्वाद लाभो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:59 IST

1 / 6
महाकुंभाचा आज ३५ वा दिवस आहे. आत्तापर्यंत ५१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केले आहे. महाकुंभाला अजून १० दिवस बाकी आहेत. त्यामुळे इथं स्थान करणाऱ्यांची संख्या ५५ कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 / 6
अशातच रविवारी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पत्नी आणि कुटुंबासह महाकुंभला पोहोचले. संगमात स्नान करून पूजा केली.
3 / 6
नितीन गडकरींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पवित्र स्थानाचे फोटो पोस्ट करत,आज प्रयागराज महाकुंभात, मला पवित्र संगमात स्नान आणि पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले! शुद्ध, निर्मळ माता गंगेचा आशीर्वाद मिळाला, असं म्हटलं.
4 / 6
त्याआधी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी कुटुंबासह प्रयागराजला पोहोचले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी गृह सचिव संजय प्रसाद हेही उपस्थित होते. महाकुंभ स्नानासाठी गडकरी आल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.
5 / 6
प्रयागराज संगम येथे पत्नीसोबत स्नान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. “गंगा स्नान आणि दर्शन पूजा खूप छान झाली. आपल्या नागपूर शहरातून हजारो लोक आपली वाहने घेऊन येथे येत आहेत. आम्हाला वाटते की प्रत्येकाला गंगा मातेचा आशीर्वाद मिळेल.”
6 / 6

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNitin Gadkariनितीन गडकरीPrayagrajप्रयागराज