शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' एक काम नक्की करा; अन्यथा तुम्हाला एलपीजी सिलेंडर मिळणार नाही

By कुणाल गवाणकर | Published: November 01, 2020 3:41 PM

1 / 10
घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. आजपासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
2 / 10
सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करण्यात आली आहे.
3 / 10
नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होता.
4 / 10
नव्या सिस्टिममध्ये केवळ बुकिंगच्या आधारावर सिलेंडरची घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल.
5 / 10
तुम्ही गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही.
6 / 10
एखाद्या ग्राहकानं वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे असलेल्या ऍपच्या मदतीनं रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येईल.
7 / 10
नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते.
8 / 10
ग्राहकांनी लवकरात लवकर त्यांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करावा, अशा सूचना तेल कंपन्यांकडून करण्यात आल्या आहेत. अन्यथा त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
9 / 10
तेल कंपन्या सर्वप्रथम नवी यंत्रणा १०० स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा लागू करण्यात आली.
10 / 10
प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आलेल्या यंत्रणेला ९५ टक्क्यांहून अधिक यश मिळालं आहे. ही योजना घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी आहे. व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी ही योजना लागू झालेली नाही.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर