शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:21 IST

1 / 5
सध्या व्हॉट्सॲपला टक्कर देणारं स्वदेशी मेसेंजिंग ॲप अराटाई (Arattai) खूप चर्चेत आलं आहे. व्हॉट्सॲपसारखे फिचर असलेल्या या इन्स्टन्ट मेसेजिंग ॲपने सध्या ॲप स्टोअरमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या ॲपची निर्मिती जोहो कॉर्पोरेशनने केली असून, त्याचे संस्थापक श्रीधर वेंबू हे आहेत. वेंबू हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी चर्चेत असतात. खरंतब वेंबू कुटुंबीय देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहेत. तसेच फोर्ब्सच्या २०२४ मधील भारतातील श्रीमंताच्या यादीत ते ५१ व्या स्थानी होते.
2 / 5
अराटाई या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमुळे चर्चेच असलेले श्रीधर वेंबू यांनी आयआयटी मद्रासमधून बीटेकची पदवी मिळवली. त्यानंतर वेम्बू पीएचडीसाठी अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेत पीएचडी पूर्ण केल्यांनंतर तिथे त्यांनी काही काळ नोकरी केली. नंतर ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
3 / 5
९० च्या दशकात दोन कुटुंबीय आणि तीन मित्रांसोबत मिळून त्यांना अॅडव्हान्स नेटची सुरुवात केली. पुढे त्याचं झोहो कॉर्प असं नामकरण झालं. त्यानंतर श्रीधन वेंबू यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या कंपनीचा कारभार सातत्याने वाढत गेले. तसेच त्यांची संपत्ती झपाट्याने वाढून ते श्रीमंतांच्या यादीत पोहोचले.
4 / 5
मात्र श्रीमंतांमध्ये समावेश झाला तरी श्रीधर वेंबू यांनी आपला साधेपणा सोडला नाही. श्रीधर वेंबू हे तामिळनाडूमधील तंजावर येथे राहतात. तसेच जवळच्या परिसरात फिरण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे प्रचंड संपत्ती असतानाही त्यांनी जपलेला साधेपणा लोकांचं लक्ष वेधून घेतो.
5 / 5
दरम्यान, एकूण संपत्तीचा विचार करायचा झाल्यास श्रीधर वेंबू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गतवर्षी २०२४ मध्ये फोर्ब्सच्या १०० श्रीमंत अब्जाधीशांमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची नेटवर्थ ही ५.८ अब्ज डॉलर एवढी होती. अराटाईला मिळालेल्या यशानंतर सध्या जोहोच्या आयपीओबद्दलसुद्धा खूप चर्चा सुरू आहेत. मात्र ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट करण्यासाठी आपण कुठलीही घाई करणार नाही, असे श्रीधर वेंबू यांनी सांगितले.
टॅग्स :businessव्यवसायSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारत