शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या, देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत कशी साजरी केली जाते होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 16:43 IST

1 / 6
बरसनामध्ये होळी-रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी 16 मार्चला 'लाठीमार होळी' साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'लाठीमार होळी'चा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक आले होते.
2 / 6
कृष्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरा-वृदांवनमध्ये फुलांची होळी खेळली जाते. इथेही लाठीमार होळीसारखीच फुलांची होळी केली जाते. इथे होळीची सुरुवात बिहारी मंदिरमधून होते. 17 मार्चपासून इथे फुलांच्या होळीला सुरुवात होईल.
3 / 6
पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतनमध्येही होळी वसंत उत्सवाच्या नावानं साजरी केली जाते. बंगालच्या संस्कृतीचं एक खास वैशिष्ट्य आहे. विश्व भारती युनिव्हर्सिटीत होळी खेळली जाते, त्याची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे.
4 / 6
पंजाबमधल्या आनंदपूर साहिबमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवात शीख समुदायातील लोक कुस्ती, मार्शल आर्ट्स आणि तलवारबाजीची कसरत करतात.
5 / 6
होळीच्या पूर्वसंध्येला उदयपूरमध्ये जोरदार तयारी केली जाते. याला रजवाडा शाही होळी संबोधलं जातं. इथे शाही अंदाजात होळी साजरी केली जाते. या उत्सवानिमित्त शाही यात्रा काढली जाते, त्यात घोडे, हत्तीपासून रॉयल बँडचा समावेश असतो.
6 / 6
जयपूरमध्ये होलिका दहनाबरोबरच रंगपंचमीला सुरुवात होते. यावेळी शाही परिवारसोबत सामान्य लोक होळी खेळतात.
टॅग्स :Holiहोळी