9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत; मोदी सरकारची केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:34 IST
1 / 6Cabinet Meeting: आज (5 मार्च 2025) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडला मोठी भेट मिळाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ असा 12.9 किलोमीटरचा रोपवे बांधण्यात येणार असून, त्यासाठी 4081 कोटी रुपये खर्च येणार आहेत.2 / 6नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडे हा रोपवे बांधण्याची जबाबदारी असेल. या रोपवेमुळे केदारनाथचे अंतर फक्त 36 मिनिटांवर येईल. सध्या पायी जाण्यासाठी 8-9 तासांचा वेळ लागतो. रोववेद्वारे एकाचवेळी 36 भाविक बसून केदारनाथ धामला पोहचू शकतील.3 / 6केंद्र सरकारचे हे पाऊल चारधाम यात्रेला चालना देण्यासाठी उचलले आहे. यामुळे स्थानिक व्यवसायांनाही फायदा होईल आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. यामुळे सहा महिने भाविकांची ये-जा सुरू असेल. शिवाय, प्रशासनावरील दबावही कमी होईल. 4 / 6केदारनाथ रोपवे प्रकल्प उत्तराखंड रोपवे कायदा, 2014 अंतर्गत कार्य करेल. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहिबमध्ये रोपवे प्रकल्प बांधण्याचा आहे, ज्यासाठी 2730 कोटी रुपये खर्च केले जातील. या प्रकल्पाद्वारे हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे अंतर काही मिनिटांवर येईल.5 / 6केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला तिसरा निर्णय शेतकऱ्यांबाबत आहे. पशुधनाचे आरोग्य आणि रोग निवारणासाठी सरकारने 3880 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या गंभीर रोगांवर उपचार केले जातील.6 / 6याशिवाय, सर्वसमावेशक लसीकरण मोहिमेवर विशेष भर. मोबाईल पशुवैद्यकीय युनिट, शेतकऱ्यांना त्यांच्या दारात मदत. थेट देखरेखीसाठी भारत पशुधन पोर्टल. प्राण्यांची औषधे: उच्च दर्जाची जेनेरिक औषधे. पीएम किसान समृद्धी केंद्र आणि सहकारी संस्थांमार्फत औषध वितरण. पारंपारिक ज्ञानाचा प्रचार: वांशिक-पशुवैद्यकीय औषधांचा प्रचार.