1 / 5नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी देशात तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. उर्तवरित टप्प्यांसाठी आता राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने या जागेवरून कन्हैया कुमार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. 2 / 5या जागेवर दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कन्हैया कुमार यांनी जेएनयूमधून राजकारणाला सुरुवात केली, तर मनोज तिवारी हे प्रसिद्ध अभिनेता आणि गायक होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, कन्हैया कुमार यांचे शिक्षण काय झाले आहे आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे? याबाबत अनेक लोकांना जास्त उत्सुकता आहे.3 / 5बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी असलेले कन्हैया कुमार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी करणे, परवानगीशिवाय सभा घेणे, डॉक्टरांशी गैरवर्तन करणे आणि इतर प्रकरणांचा समावेश आहे. 4 / 5बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी असलेले कन्हैया कुमार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी करणे, परवानगीशिवाय सभा घेणे, डॉक्टरांशी गैरवर्तन करणे आणि इतर प्रकरणांचा समावेश आहे. 5 / 5कन्हैया कुमार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) एमफिल आणि डीफिल केले आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास कन्हैया कुमार यांनी दिल्लीतील निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवारांपेक्षा जास्त शिक्षित आहेत.