By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 21:03 IST
1 / 6दिल्लीमध्ये गुन्हेगारी जगताचं अनोखं मिलन पाहायला मिळालं. कुख्यात गँगस्टर काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नासाठी काला जठेडी याला ६ तासांची पॅरोल देण्यात आली होती. 2 / 6आज सकाळी ९ वाजता अनुराधा ही मंगल कार्यालयात पोहोचली. सुरुवातीला अनुराधा ही स्वत: पाहुण्यांची यादी तपासताना दिसत होती. 3 / 6त्यानंतर काला जठेडी उर्फ संदीप याला दिल्ली पोलीस थर्ड बटालियन स्वाट कमांडोसह सकाळी १०.१५ वाजता घेऊन लग्नस्थळी आले. विवाह मंडपात पाहुण्यांना कसून तपासणी केल्यानंतरच जाऊ दिले जात होते. 4 / 6पहिल्या पंक्तीत पाहुणे मंडळी होती. तर दुसऱ्या पंक्तीत पोलीस कर्मचारी तैनात होते. तिसऱ्या लेअरमध्ये मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. चौथ्या पंक्तीमध्ये तैनात पोलीस कर्मचारी विवाह सोहळ्याचं चित्रिकरण करत होते. लग्न मंडपाच्या आजूबाजूच्या घरांवर पोलीस आणि स्नायपर्स तैनात करण्यात आले होते. 5 / 6वरमाला आणि सप्तपदी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पूर्ण झाली. विवाहासाठी पुरोहितांनी १२ च्या आसपासचा मुहूर्त काढला होता. 6 / 6 या विवाह सोहळ्यादरम्यान, कुठल्याही गँगवॉरची शक्यता गृहित धरून त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्राइम ब्रँच, स्पेशल सेल, लोकल पोलीस आमि स्वाट कमांडो यांचं पथक उपस्थित होतं. सुमारे २५० पोलीस कर्मचारी लग्नमंडपात आणि बाहेर उपस्थित होते. तर लग्न सोहळ्याला सुमारे ७० ते ८० पाहुणे उपस्थित होते.