शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:16 IST

1 / 9
Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल सोमवारी रात्री अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला.
2 / 9
धडखड यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या राजीनामामुळे उपराष्ट्रपतीपद चर्चेत आले आहे. त्यांना किती पगार मिळतो? सुविधा कोणत्या मिळतात या चर्चा सुरू आहेत.
3 / 9
जगदीप धनखड यांनाही लाखो रुपये पगार मिळत होता. उपराष्ट्रपतींना चांगल्या पगारासोबतच सरकारकडून अनेक सुविधा मिळतात.
4 / 9
उपराष्ट्रपतींना दरमहा सुमारे ४ लाख रुपये पगार मिळतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात, ज्यांना 'संसद अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कायदा, १९५३' नुसार पगार दिला जातो. २०१८ पूर्वी राष्ट्रपतींना फक्त १.२५ लाख रुपये मिळत होता, यामध्ये नंतर वाढ करण्यात आली.
5 / 9
लाखोंच्या पगाराव्यतिरिक्त, उपराष्ट्रपती पदासाठी अनेक सुविधा देखील दिल्या जातात. मोफत उपचार दिले जातात. याशिवाय रेल्वे आणि विमान प्रवास पूर्णपणे मोफत आहे.
6 / 9
राहण्यासाठी बंगला, लँडलाइन कनेक्शन, दैनिक भत्ता, मोबाईल फोन सुविधा आणि संपूर्ण सुरक्षा दिल्या जातात. उपराष्ट्रपतींना एक सहाय्यक आणि एक ड्रायव्हर देखील मिळतो.
7 / 9
जर उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर त्यांच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम त्यांना पेन्शन म्हणून दिली जाते.
8 / 9
याशिवाय त्यांना सुरक्षा, कर्मचारी, प्रवास आणि मोफत उपचार यासारख्या सुविधा मिळत राहतात.
9 / 9
उपराष्ट्रपतींना पद सोडताच त्यांचे निवासस्थान सोडावे लागते. यासाठी त्यांना काही दिवसांचा वेळ दिला जातो.
टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतBJPभाजपा