1 / 8उन्हाळी सुट्टीमध्ये अनेकजण गावी जाण्याचा किंवा बाहेर जाण्याचा प्लान करत असतात. यावेळी रेल्वेचं तिकीट मिळणं देखील खूप मुश्कील होऊन जातं. अशावेळी तत्काळ तिकीटच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा पर्याय असतो. 2 / 8तत्काळ तिकीट हे २४ तास आधी बूक करता येतं. पण ज्या रेल्वे मार्गावर जास्त प्रवासी असतात अशा रेल्वेमार्गावरचं तत्काळ तिकीट मिळवणं देखील खूप कठीण काम होऊन बसतं. त्यामुळेच प्रवासी तिकीट बुकींसाठी एजंटकडे अनेक फेऱ्या मारतात. 3 / 8IRCTC च्या वेबसाईटवर काही टिप्स फॉलो करुन तुम्ही सहज तत्काळ तिकीट बूक करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC अॅप आणि मास्टर लिस्ट फीचरचा वापर करावा लागेल. IRCTC अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकता. 4 / 8अॅप डाऊनलोड केल्यानंतर IRCTC आयडीनं लॉगइन करा. त्यानंतर तुम्हाला मास्टर लिस्ट फीचरचा वापर करावा लागेल. या फिचरमध्ये तुम्ही तुमच्या प्रवासाची माहिती आधीच भरून ठेवू शकता. ज्यामुळे तिकीट बुकिंगवेळी तुम्हीला पुन्हा माहिती भरावी लागणार नाही. यात तुमचा बराच वेळ वाचेल. 5 / 8तत्काळ तिकीट बुक करताना टायमिंग फार महत्वाच असतं. त्यामुळे मास्टर लिस्ट फीचर वापरुन तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. मास्टर लिस्ट फीचर वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी IRCTC अॅप डाऊनलोड करुन ते ओपन करुन लॉग इन करावं लागेल 6 / 8यानंतर तुम्हाला अॅपमध्ये दिल्या गेलेल्या ऑप्शनमधून माय मास्टर लिस्टचा ऑप्शन निवडावा लागेल. यात प्रवाशाला आपल्या प्रवासाची सर्व माहिती भरता भरुन ती सेव्ह करता येईल. एसीमध्ये तत्काळ बुकिंग १० वाजल्यापासून तर स्लीपरमध्ये तत्काळ बुकिंग ११ वाजल्यापासून सुरू होते. 7 / 8तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या १ किंवा २ मिनिटं आधी तुम्ही अॅप सुरू करुन लॉग इन करा. यानंतर प्रवासाचा रूट सिलेक्ट करुन त्यात संपूर्ण माहिती मास्टर लिस्टचा वापर करुन अॅड करुन घ्या. 8 / 8त्यानंतर पेमेंटच्या ऑप्शनमध्ये UPI चा पर्याय निवडून यामाध्यमातून पेमेंट करा यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता देखील वाढते.