भारताचे हे त्रिकुट करणार समुद्रावर राज्य; PM मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS सूरत, निलगिरी आणि वाघशीर किती प्राणघातक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 09:48 IST
1 / 11मुंबईच्या नौदल गोदीत त्यांच्या हस्ते सकाळी १०.३० च्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी व आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रर्पण होणार आहे. या तीन अत्याधुनिक युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.2 / 11पीएम मोदी यांनी मंगळवारी आपल्या पोस्टमध्ये, '१५ जानेवारी हा आमच्या नौदलाच्या क्षमतेसाठी खास दिवस असणार आहे. तीन आघाडीच्या नौदल लढाऊ जहाजांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेता बनण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वावलंबनाच्या दिशेने आमचे प्रयत्न बळकट होतील,' असं म्हटलं.3 / 11आयएनएस सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १५B अंतर्गत तयार केलेले चौथे आणि शेवटचे स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र विनाशक आहे. त्याचा पाया ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घातला गेला आणि १७ मे २०२२ रोजी ते तयार झाले.4 / 11भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने हे डिझाइन तयार केले आहे. या युद्धनौकेमध्ये प्रगत रडार यंत्रणा आणि स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे शत्रूवर गुप्तपणे हल्ला करता येतो.5 / 11याचे वजन ७,४०० टन असून १६४ मीटर लांब आहे. त्याच्या 'कम्बाइंड गॅस अँड गॅस' प्रणालीसह, हे जहाज ३० सागरी मैल वेगाने धावू शकते. यावरुन चेतक, ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, MH-60R हे हेलिकॉप्टर ऑपरेट होऊ शकते.6 / 11आयएनएस निलगिरी हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत पहिले स्टेल्थ फ्रिगेट आहे जे सागरी सुरक्षेला नवी दिशा देईल. त्याची निर्मिती २८ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली आणि २८ सप्टेंबर २०१९ रोजी ते पूर्ण झाले.7 / 11याचे वजन ६,६७० टन असून ते १४९ मीटर लांब आहे. आयएनएस निलगिरीची खास रचना रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी करण्यात आली आहे, जेणेकरून ती शत्रूच्या नजरेतून सुटू शकेल. 8 / 11हे जहाज सुपरसॉनिक पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या युद्धनौकेने ऑगस्ट २०२४ मध्ये सागरी चाचण्या सुरू केल्या आणि सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या.9 / 11आयएनएस वाघशिर ही भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-श्रेणी प्रकल्प ७५ अंतर्गत बांधलेली सहावी आणि शेवटची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. ही विशेषत: खास ऑपरेशन्ससाठी डिझाइन केले गेली आहे जेणेकरुन ते कोणत्याही आवाजाशिवाय शत्रूच्या भागात आपली मोहीम पार पाडू शकतील. 10 / 11ही ६७ मीटर लांब आणि १,५५० टन वजनाची पाणबुडी वायर-गाइडेड टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार यंत्रणांनी सुसज्ज आहे. भविष्यात, त्यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञान जोडण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्याची क्षमता आणखी वाढेल.11 / 11यामध्ये चार गॅस टर्बाइन्स ऑपरेट करण्यासाठी 'कम्बाइंड गॅस अँड गॅस' प्रोपल्शन सिस्टम आहे. सागरी चाचण्यांदरम्यान पाणबुडीने ३० नॉट्स (सुमारे 56 किमी/तास) वेग गाठला आहे.