शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 21:28 IST

1 / 9
ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगाने मेक इन इंडिया अर्थात भारतीय निर्मितीच्या शस्त्रास्त्रांचा पराक्रम बघितला. यानंतर आता, देशाची मान आणखी वाढवण्यासाठी आणखी एक युद्धनौका INS महेंद्रगिरी तयर आहे. महेंद्रगिरी एवढी बलाढ्य आहे की, शत्रूला हिच्या समोर उभे राहण्याचीही संधी मिळणार नाही.
2 / 9
भारतीय नौदल देशाच्या सुमारे ११ हजार किलोमीटरच्या किनारपट्टीचे रक्षण करते. यात ३२० किलोमीटरच्या विशेष आर्थिक क्षेत्राचाही समावेश आहे. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल नेहमीच तत्पर असते आणि आता एक नवीन युद्धनौका नौदलात सामील होत आहे.
3 / 9
या युद्धनौकेची लांबी १४९ मीटर, रुंदी १७.८ मीटर आणि कमाल वेग २८ नॉट्स एवढा असेल. महेंद्रगिरी ही प्रोजेक्ट 17A मधील शेवटचे युद्धनौका आहे. या प्रकल्पांतर्गत माझगाव डॉक येथे चार युद्धनौका बांधण्यात येत आहेत.
4 / 9
एमडीएलद्वारे बांधले जात असलेले नीलगिरी वर्गाचे चौथे आणि शेवटचे जहाज 'महेंद्रगिरी' हे भारतीय नौदलाच्या ब्युरो ऑफ नेव्हल डिझाइनने डिझाइन केले आहे.
5 / 9
चीन आणि पाकिस्तानची झोप उडेल - हे जहाज अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, दळणवळण सुविधा आणि इतर काही प्रणालींनी सुसज्ज आहे. हे जहाज भारतीय नौदलात आल्यानंतर, चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार हे नक्की.
6 / 9
अशी आहे महेंद्रगिरीची खासियत - गोळीबारात मदत करेल, दोन 30 मिमी रॅपिड फायर बंदुका जहाजाची जवळून संरक्षम क्षमता वाढवेल. तर एक एसआरजीएम गन नौसैनिकांना गोळीबारात मदत करेल.
7 / 9
स्वदेशी बनावटीचे ट्रिपल ट्यूब लाईट वेट टॉर्पेडो लाँचर आणि रॉकेट लाँचर जहाजाची पाणबुडीविरोधी क्षमता वाढवेल. 'महेंद्रगिरी'चे विस्‍थापन जवळपास 6,600 टन तर कमाल वेग जवळपास ३० नॉट्स एवढा असेल.
8 / 9
धोक्याचा सामना करण्यास सज्ज - या प्रकल्पातील जहाजे, शत्रूची विमाने आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. या प्रगत जहाजांवर लांब पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणालीही सज्ज असेल. ही वैशिष्ट्ये फ्रिगेट्सना रडार आणि इतर सेन्सर्सपासून लपण्यास मदत करतात. यामुळे फ्रिगेट्सना शत्रूचे हल्ले टाळण्यास मदत होते.
9 / 9
या जहाजात, हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे आणि स्वदेशी विकसित शस्त्र प्रणाली यांचाही समावेश आहे. ही शस्त्रे आणि सेन्सर्स फ्रिगेट्सना विविध लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम करतात.
टॅग्स :indian navyभारतीय नौदलSoldierसैनिकIndiaभारतDefenceसंरक्षण विभाग