शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात उत्तर कोरिया, बांगलादेशपेक्षा भूकेची स्थिती वाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 1:48 PM

1 / 4
भारतात राजकारणी विकासाचे दावे करत असले तरी, देशात उपाशीपोटी झोपणा-यांची संख्या कमी नाही. देशात भूकेची समस्या गंभीर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
2 / 4
119 विकसनशील देशांचा जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चने प्रसिद्ध केला आहे. या यादीमध्ये भारत 100 व्या स्थानी आहे.
3 / 4
भारत उत्तर कोरिया, बांगलादेश आणि इराकसारख्या देशांपेक्षाही मागे आहे तर, पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. 119 देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानी असून संपूर्ण आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या पुढे आहेत.
4 / 4
मागच्यावर्षी भारत 97 व्या स्थानी होता. लहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो. या समस्येवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्राने कटिबद्धता दाखवणे आवश्यक आहे असे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.
टॅग्स :foodअन्न