वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:05 IST
1 / 12Indian Railway Ticket Booking Trick: भारतीय रेल्वेत आताच्या घडीला वंदे भारत सर्वांत लोकप्रिय ट्रेन आहे. वंदे भारत एक्स्प्रेस येण्यापूर्वी राजधानी एक्स्प्रेसची क्रेझ मोठी होती. आयुष्यात एकदा तरी राजधानी एक्स्प्रेसने जाण्याची इच्छा हजारो प्रवाशांची आजही असते. ती जागा आता वंदे भारत ट्रेनने घेतली आहे. 2 / 12देशातील प्रिमियम ट्रेनची यादी मोठी आहे. या प्रिमियम ट्रेनच्या सुविधा, सोयी, अत्याधुनिकता जेवढी जास्त, तेवढी तिकिटाची किंमतही जास्त. त्यामुळेच अनेकदा सामान्य प्रवाशांना या ट्रेनचे तिकीट परवडत नाही. 3 / 12असे असले तरी वंदे भारत, राजधानी, शताब्दी यांसारख्या प्रिमियम ट्रेनच्या तिकिटात तब्बल ५०० रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. या ट्रिक बाबत अनेकांना माहिती असेलच असे नाही. परंतु, या ट्रिकचा वापर करून कमी किमतीत रेल्वेचे तिकीट काढले जाऊ शकते.4 / 12प्रीमियम गाड्यांचे तिकिटे खूपच महाग असतात. तथापि, विशेषत: पहिल्या स्थानकापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंतचे पूर्ण अंतराचे तिकीट तर खूपच महाग असते. यामध्ये खानपान सेवेवरून अनेक वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 5 / 12अनेकदा प्रवाशांना अनिच्छेने खानपानाचे पैसे देण्यास भाग पाडले जात आहे. पण तसे नाही. तुम्ही तुम्हाला हवे असलेला खानपानचा पर्याय निवडू शकता किंवा खानपान नको, असाही पर्याय स्वीकारू शकता. तिकीट बुकिंग करताना खानपान सेवा नको, असा पर्याय निवडल्यास तुम्ही तुमच्या प्रवास भाड्यात ३०० ते ५०० रुपये वाचवू शकता.6 / 12भारतीय रेल्वेने राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस किंवा वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये जेवण अनिवार्य केले आहे का? असा दावा अनेक प्रवाशांनी केल्यानंतर यासंदर्भातील चर्चा सुरू झाली. परंतु, असे नाही. तुम्हाला खानपान सेवा नको असेल, तर तुम्ही तसा पर्याय निवडू शकता.7 / 12एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने अशा दाव्यांचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, प्रीमियम ट्रेनचे तिकिटे बुक करताना ‘नो फूड’ हा पर्याय काढून टाकण्यात आलेला नाही. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की ‘नो फूड’ हा पर्याय अजूनही त्याच पानावर उपलब्ध आहे. 8 / 12तिकीट बुकिंग करताना नाव, वय इत्यादी माहिती भरली की, खाली Other Preference यामध्ये I don't want Food/Beverages हा पर्याय निवडू शकता. हा पर्याय निवडल्यावर खानपान सेवा तुम्हाला घेता येणार नाही.9 / 12खानपान सेवांसाठी तुम्ही निवडलेल्या मार्गांसाठी रेल्वेकडून जो काही दर निश्चित करण्यात आला असेल, तो तुम्हाला द्यावा लागणार नाही. म्हणजेच तुमच्या एकूण तिकिटातून खानपान सेवेचा दर वजा होऊ शकतो. 10 / 12परिणामी रेल्वेचे तिकीट बुक करताना तुम्ही ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची बचत करू शकता, असे सांगितले जात आहे. अनेकांना रेल्वेतील जेवण, खानपान सेवा रुचत नाही. पैसे घेऊनही चांगला नाश्ता, जेवण देत नसल्याबाबत अनेक प्रवासी तक्रार करत असतात.11 / 12अनेकदा रेल्वेच्या खानपान सेवांमध्ये त्रुटी आढळून येतात. चांगली स्वच्छता नसते. जेवण करताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, असा सूरही प्रवाशांचा असतो. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगतात लगेचच प्रवासी चुकीच्या गोष्टीची माहिती व्हायरल करताना दिसतात. 12 / 12जेवणात झुरळ सापडणे, खराब जेवण प्रवाशांना देणे, बुरशी लागलेल्या गोष्टीही प्रवाशांना देणे, असे अनेक प्रकार रेल्वेच्या खानपान सेवेबाबत घडलेले आढळून आलेले आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन रेल्वेनेही अनेक बदल खानपान सेवेत, सेवा पुरवठा करणाऱ्यांच्या नियमात केलेले आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो.