By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:52 IST
1 / 10भारताच्या मदतीनं बांगलादेश सैन्यातील अंतर्गत सत्तांतर उलथवून लावण्याचं षडयंत्र अपयशी ठरलं आहे. परंतु बांगलादेश लष्कराचे प्रमुख जनरल वकार उज्जमान यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. रिपोर्टनुसार, मागील आठवड्यात भारताने बांगलादेश सैन्याचे प्रमुख जनरल वकार उज्जमान यांना काही पाकिस्तान समर्थक जनरलच्या बंडाला दडपण्यासाठी मदत केली होती. 2 / 10काही पाकिस्तानी समर्थक अधिकाऱ्यांनी आर्मी चीफला हटवण्यासाठी बैठक घेतली होती परंतु भारताने बांगलादेश सैन्याचे प्रमुख वकार उज्जमान यांना आधीच त्याबाबत कल्पना दिली. ज्यातून वकार उज्जमान यांना त्यांची खुर्ची वाचवण्यात यश मिळालं. 3 / 10स्वराज्य मॅगजीनच्या रिपोर्टनुसार,भारताने ना केवळ बांगलादेशी लष्कर प्रमुखाला खुर्ची वाचवण्यात मदत केली नाही तर कट्टरपंथी सरकार चालवणाऱ्या मोहम्मद युनूस यांनाही मोठा झटका दिला आहे. बांगलादेशी सैन्य प्रमुखाविरोधात सत्तांतराचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत.4 / 10गुप्तचर माहितीनुसार, बांगलादेश सैन्यात बंडखोरी करून आर्मी प्रमुखालाच पदावरून हटवण्याचा कट रचला जात होता. हा कट पाकिस्तानच्या इंटर सर्विसेज इंटेलिजेंस(ISI) नं तयार केला होता. ISI जनरल वकार उज्जमान यांच्यावर नाराज होती कारण सैन्य प्रमुख बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांना विरोध करत होते.5 / 10आयएसआयच्या या कटाला ना केवळ मोहम्मद युनूस तर बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांचेही समर्थन होते. ५ ऑगस्टला पंतप्रधान शेख हसीना यांना हिंसक आंदोलनानंतर जीव वाचवून देशातून पळून भारतात यावं लागले. त्यानंतर देशात फक्त सैन्यच आहे ज्यांनी अद्याप कट्टरपंथींसमोर गुडघे टेकले नाहीत. 6 / 10शेख हसीना यांना देशातून सुरक्षित बाहेर काढल्याचा रागही जनरल वकार उज्जमान यांच्यावर आहे. बांगलादेश सैन्यातील गुप्तचर यंत्रणेच्या उच्चपदस्थ सूत्रांनुसार, ADSM नेते आणि कट्टरपंथी यांनी ५ ऑगस्टला शेख हसीना यांना त्यांच्या घरातच पकडण्याचा प्रयत्न केला होता. शेख हसीना यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवून फाशी द्यावी असा प्लॅन आखला होता.7 / 10बांगलादेश सैन्य प्रमुख वकार यांनी देशात अराजकता आणि अशांतता याविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. हा इशारा मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला होता ज्यातून कट्टरपंथी इस्लामवादी मोहम्मद युनूस नाराज झाले होते. त्यामुळेच वकार यांना हटवण्यासाठी लेफ्टिनंट जनरल फैजुर रहमान यांच्या पुढाकाराने लष्करात बंडखोरी होणार होती.8 / 10सैन्यात सत्तांतर घडवून नवीन लष्कर प्रमुख बसवणार होते. जनरल रहमान जमात ए इस्लामीचे निकटवर्तीय असून कट्टर इस्लामवादी आहेत.ते पाकिस्तानी सैन्याच्या जवळचे मानले जातात. मागील वर्षी क्वार्टरमास्टर जनरल बनल्यानंतर रहमान यांनी काही महिने डीजीएफआय प्रमुखाची जबाबदारी सांभाळली होती.9 / 10ISI नं बांगलादेश सैन्यात सत्तांतर घडवण्याचा कट रचला होता परंतु भारतीय गुप्तचर यंत्रणेला त्याची भनक लागली. त्यानंतर त्याची माहिती बांगलादेशी सैन्य प्रमुखाला देण्यात आली. त्यानंतर वकार उज्जमान यांनी हालचाली वाढवत त्यांच्या समर्थकांना जमा करण्यास सुरू केले. त्याशिवाय सत्तांतर रोखण्यासाठी भारतासह काही पाश्चिमात्य देशांशी संपर्क साधला.10 / 10भारताने अमेरिकेला याबाबत कल्पना देत अशा सत्तांतराने ना केवळ बांगलादेश अस्थिरता येईल तर प्रादेशिक सुरेक्षेचा प्रश्न गंभीर होईल असं सांगितले. त्यानंतर अमेरिकेने याची दखल घेत मोहम्मद युनूस यांना सत्तांतराविरोधात इशारा दिला आणि लष्करातले सत्तांतर टळले. भारताने जनरल वकार उज्जमान आणि अमेरिकन सुरक्षा गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांचे बोलणेही करून दिले.