शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India-China Relations : भारत-चीन सीमेवर रंगला सामना; भारतीय सैनिकांनी लुटला क्रिकेटचा आनंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:55 IST

1 / 7
India-China Relations: भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशाचे संबंध आणखीच बिघडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर तणाव वाढलेला आहे. पण, या तणावादरम्यान भारतीय सैन्याने क्रिकेटचा आनंद लुटला.
2 / 7
India-China Relations: भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशाचे संबंध आणखीच बिघडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर तणाव वाढलेला आहे. पण, या तणावादरम्यान भारतीय सैन्याने क्रिकेटचा आनंद लुटला.
3 / 7
सैनिकांचे छायाचित्र पोस्ट करून भारतीय लष्कराने सांगितले की, गलवान व्हॅलीजवळ सैनिकांनी क्रिकेटचा आनंद लुटला. पण, नेमक्या कोणत्या भागात हा सामना झाला, याची माहिती दिली नाही.
4 / 7
त्रिशूल विभागाच्या पटियाला ब्रिगेडने गलवानी व्हॅलीजवळ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भारतीय लष्कराने ट्विट करत ही माहिती दिली. यापूर्वी, गुरुवारी (2 मार्च) चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी एस जयशंकर यांची भेट घेतली होती.
5 / 7
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (2 मार्च) चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले की, भारत आणि चीनमधील संबंध 'असामान्य' आहेत. बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवरील आव्हाने, विशेषत: सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्याशी संबंधित आव्हानांवर चर्चा केली.
6 / 7
जयशंकर यांनी बैठकीनंतर सांगितले की, परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर आमची ही पहिलीच बैठक आहे. आम्ही सुमारे 45 मिनिटे एकमेकांशी चर्चा केली आणि ही चर्चा आमच्या नातेसंबंधाच्या सद्य स्थितीबद्दल होती. काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
7 / 7
गलवान खोऱ्यातच पूर्व लडाख सीमा भागात 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग सरोवर परिसरात झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव निर्माण झाला होता. त्या चकमकीत 20 सैनिक शहीद झाले होते.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन