भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:59 IST
1 / 5सुरक्षित लैंगिक संबंध आणि संतती नियमनासाठी कंडोमचा वापर करणं ही आता सामान्य बाब बनली आहे. मात्र अजूनही मेडिकलमध्ये गेल्यावर कंडोमची मागणी करताना लोक संकोचलेले दिसतात. त्यामुळे नुसत्या खाणाखुणा करून कंडोमची खरेदी विक्री होते. 2 / 5मात्र कंडोमचं नाव घेण्यासही लोक कचरत असले तरी आज कंडोमचा व्यवसाय जगभरात अब्जावधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच हा व्यवसाय दिवसेंदिवस विस्तारत आहे. 3 / 5एका रिपोर्टनुसार चीनमध्ये कंडोमचा वापर सर्वाधिक होतो. ५.८ अब्ज युनिट्ससह चीन आशियामधील कंडोमचा सर्वात मोठा ग्राहक आणि वापरकर्ता आहे. तर कंडोमच्या एकूण खरेदीमध्ये चीनचा वाटा ४२ टक्के आहे. तर २.४ अब्ज युनिट्ससह भारत हा कंडोमच्या वापरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ७०१ दशलक्ष युनिट्ससह तुर्की तिसऱ्या क्रमांकावर आहे. 4 / 5कंडोमच्या एकूण वापरामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर असला तरी कंडोमच्या दरडोई वापरामध्ये संयुक्त अरब अमिराती आघाडीवर आहे. येथे प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ३१ युनिट्सचा वापर करते. त्यानंतर तुर्की, व्हिएतनाम आणि थायलंडचा नंबर लागतो. 5 / 5एका रिपोर्टनुसार २०२४ पासून २०३५ पर्यंत आशियाई कंडोम मार्केट सरासरी ३ टक्के दराने वार्षिक वाढ नोंदवणार आहे. याचा अर्थ येणाऱ्या दशकात कंडोमचा बाजार केवळ वेगच पकडणार नाही तर मोठी झेपही घेणार आहे.