By महेश गलांडे | Updated: October 27, 2020 16:30 IST
1 / 9 दिल्ली आयकर विभागाच्या पथकाने दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथील तब्बल 42 ठिकाणी छापा मारला. आयकर विभागाने या धाडीत मोठं घबाड हस्तगत केलं आहे. 2 / 9विभागाच्यावतीने आत्तापर्यंत टाकलेल्या छाप्यात 2.37 रुपये रोकड आणि 2.89 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. 3 / 9एंट्री ऑपरेटर संजय जैन आणि त्याच्या लाभार्थींच्या एकूण 42 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली, त्यामध्ये मोठा माल विभागाला मिळाला आहे.4 / 9आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही धाडसत्र सुरूच असून पैसे आणि ज्वेरली ताब्यात घेण्यात आली आहे. 5 / 9तब्बल 42 ठिकाणांवर ही धाड टाकण्यात आली असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. 6 / 9हैदराबामध्ये यापूर्वी आयकर विभागाने मोठी धाड टाकली होती, त्यावेळी एका महसूल अधिकाऱ्याकडून मोठी संपत्ती जप्त करण्यात आली होती7 / 9केंद्रीय आयकर विभागाने खोट्या बिलाच्या आधारे रोकड जमा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 8 / 9विभागाने आपल्या कारवाई मोठ्या प्रमाणात रोकड आणि मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या आहेत. 9 / 9आयकर विभागाकडून अद्यापही छापेमारी सुरू असून आणखी घबाड मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे