शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हमास'चं संकट भारताच्या वेशीवर धडकलं; पाकिस्तान रचतंय मोठं षडयंत्र? यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:20 IST

1 / 10
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला विराम मिळाला आहे. त्यानंतर हमास असं काही करायला निघाला आहे ज्याने भारताची चिंता वाढणार आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा पाकव्याप्त काश्मीरात एक कार्यक्रम आयोजित करणार असून तिथे हमासचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत.
2 / 10
जैश ए मोहम्मदचा मुख्य दहशतवादी मसूद अजहर आहे. हा कार्यक्रम रावलकोट इथं होणार असून जे दहशतवाद्यांचा गड मानला जातो. याठिकाणी हमासच्या नेत्यांचे पोस्टर्स लागले आहेत. जम्मू काश्मीरात सातत्याने भारतीय सैन्याच्या दबावामुळे JEM खूप कमकुवत झाला आहे. त्यामुळे आता संघटना मजबुतीसाठी त्यांना हमासची मदत घ्यावी लागत आहे.
3 / 10
POK च्या साबिर शहीद स्टेडियममध्ये काश्मीर सॉलिडेरिटी अँन्ड अल अक्सा फ्लड कॉन्फरन्सच्या नावाखाली ५ फेब्रुवारीला एक बैठक होत आहे. हमास नेत्याची पाकव्याप्त काश्मीरात उपस्थिती भारतासाठी चांगले संकेत नाहीत. त्यामुळे आता ही वेळ आलीय का? की भारतानेही हमासला एक दहशतवादी संघटना घोषित करावं हा प्रश्न उपस्थित होत आहे.
4 / 10
माहितीनुसार, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कार्यक्रमाला हमास प्रवक्ते खालिद कद्दूमीचे भाषणही होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये काही मोठं षडयंत्र रचतंय, पाकव्याप्त काश्मीरात जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबासारखे हमासही पाय रोवतंय का अशी चर्चा सुरू आहे.
5 / 10
गुप्तचर यंत्रणेनुसार, पाकिस्तान यामाध्यमातून जश्मू काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा लावून धरण्याचा प्रयत्न करणार आहे. फिलिस्तान आणि काश्मीर एकसारखाच मुद्दा आहे. दोन्ही ठिकाणी मुस्लिमांचा छळ केला जात आहे. ही दोन्ही ठिकाणे एकसारखीच असल्याचं दाखवून इस्लामिक देशांना एकत्र येण्याचं आवाहन करू शकतो.
6 / 10
सध्या तुर्की, मलेशियासारख्या देशांनी अनेकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरून भारताविरोधी भूमिका घेतली आहे तर सौदी अरब, यूएई, कतार आणि कुवैतसारखे देश पाकिस्तानी अजेंड्यापासून दूर राहिलेत. ५ फेब्रुवारीला काश्मीर एकजुटता दिवस साजरा करून तिथे नवीन प्रोपेगेंडा रचला जाण्याची शक्यता आहे.
7 / 10
भारत सरकारने आजतागायत हमासला दहशतवादी संघटना मानले नाही. भारत सातत्याने फिलिस्तानचं समर्थन करत आला आहे. इस्त्रायलने वेळोवेळी भारताकडे मागणी केली की त्यांनी हमासला एक दहशतवादी संघटना मानावे. २०२३ साली इस्त्रायलने भारतातील २६/११ हल्ल्याला जबाबदार मानत लष्कर ए तोयबाला दहशतवादी संघटना घोषित केले होते.
8 / 10
मागील ऑगस्टमध्ये हमास आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिद यांच्यात बैठक झाली होती. कतारची राजधानी दोहा इथं हमास नेता खालिदा मेशालसोबत बैठकीनंतर भारत अलर्टवर होता. सैफुल्ला खालिदला २०१८ साली अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
9 / 10
हमास आणि सैफुल्ला खालिद यांच्या भेटीनंतर सांगण्यात आले होते की, इराणमध्ये हमासचा मुख्य इस्माईल हानियाच्या हत्येवर संवेदना व्यक करण्यासाठी त्याने मेशालची भेट घेतली होती. सैफुल्ला खालिद हा लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफीज सईदचा निकटवर्तीय मानला जातो.
10 / 10
POK मध्ये अल अक्सा फ्लड नावाखाली कार्यक्रम आयोजित केला आहे. अल अक्सा येरूशलममधील एक मस्जिद आहे. ज्यावर मुस्लीम आणि यहुदी दोघांचा दावा आहे. त्या नावाने पीओकेत कार्यक्रम आयोजित होणे धोकादायक आहे. त्यातून मुस्लीम उम्मा एकता संदेश देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
टॅग्स :IndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओकेJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध