शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

देशातलं असं शहर ज्याठिकाणी चितेची राख लावून साजरी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 17:55 IST

1 / 5
देशभरात २० मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे. त्यानंतर रंगांची उधळण करून नागरिक उत्साहाने रंगपंचमी पर्यंत हे पर्व साजरे करतील. मात्र देशातील प्राचीन धर्मनगरी वाराणसी येथे गेल्या ३५० वर्षांपासून वेगळ्याच प्रकाराने होळी साजरी केली जाते
2 / 5
रंगभरी एकादशी झाल्यावर दुसरे दिवशी पार्वती किंवा गौरीची पाठवणी करण्याच्या निमित्ताने ही होळी खेळली जाते त्यावेळी मणिकर्णिका घाटावर जळत असलेल्या चितेमधून राख किंवा भस्म गोळा केले जाते आणि त्याची उधळण केली जाते.
3 / 5
पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीला महादेव पार्वती विवाह होतो आणि वसंत पंचमी पर्यंत हा विवाहसोहळा चालतो त्यानंतर एकादशीला पार्वतीची सासरी पाठवणी होते. या वेळी महादेव वऱ्हाडी सोबत महास्मशानात होळी खेळतात. ही होळी चिता भस्माने खेळली जाते.
4 / 5
ती पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने लोक येतात. होळीची सुरवात होण्याअगोदर महाआरती केली जाते त्यावेळी जळत्या चितांच्या मध्ये ५१ संगीतकार विविध प्रकारची पारंपारिक वाद्ये वाजवितात
5 / 5
असे मानले जाते कि या होळीत भूत, पिशाच्चासह सर्व जीव जंतू सामील होतात. चितेतील भस्म चाळले जाते आणि तेच एकमेकांच्या अंगावर आणि हवेत उडविले जाते. मृत्युनंतर मनकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार झाले तर त्या जीवाला मुक्ती मिळते अशी हिंदू धर्मीयांची भावना आहे.
टॅग्स :HinduहिंदूHoliहोळीVaranasiवाराणसीIndian Festivalsभारतीय सण