दरमहा 1300 रुपये गुंतवून मिळवा 12 लाख 80 हजार; पाहा पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:45 IST
1 / 7गेल्या दीड वर्षांपासून देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात छोट्यांपासून मोठ्यांपर्यत सर्वच उद्योगधंदे बंद पडली आहे. त्यामुळे अनेकांना पैसांची अडचण भासत आहे. सध्याच्या काळात नोकरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवर फक्त घर चालू शकत नाही. त्यामुळे लोक पैसे मिळवण्यासाठी किंवा सध्या उपलब्ध असलेल्या पैशांची गुंतवणुक कशी करता येईल, याचा विचार करत असतात. पोस्टाच्या विविध योजनांमधून तुम्ही कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करू शकता. 2 / 7पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. यामध्ये पोस्टल इन्शुरन्स प्लॅन्सचा देखील समावेश आहे. भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी हे इन्शुरन्स प्लॅन्स अत्यंत फायद्याचे आहेत. पोस्टाच्या अशा एका योजनेबाबत जाणून घ्या ज्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या स्कीमअंतर्गत तुम्हाला मॅच्युरिटीवर सम अश्योर्डसह बोनस देखील मिळेल. या पॉलिसीचं नाव संतोष पॉलिसी असं आहे.3 / 7 ही पॉलिसी कमी गुंतवणुकीत अधिक रिटर्न देणारी असली तरी सर्वजण यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. या योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी, निम्न-सरकारी कर्मचारी, सीए, मॅनेजमेंट कन्सलटंट, वकील आणि बँकर या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. जे लोकं सरकार द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत आहेत ते देखील संतोष पॉलिसी घेऊ शकतात. एनएसई किंवा बीएसई लिस्टेड कंपन्यांत काम करणारे कर्मचारी देखील ही पॉलिसी खरेदी करू शकतात.4 / 7 सदर एक रेग्यूलर प्रीमियम पॉलिसी आहे. ज्यामध्ये जेवढ्या वर्षाची पॉलिसी असेल तेवढ्या वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी कमीत कमी 19 ते जास्तीत जास्त 55 वयवर्ष असणारे नागरिक खरेदी करू शकतात. पॉलिसी घेताना तुम्हाला हे निश्चित करावे लागेल की मॅच्युरिटी कोणत्या वर्षात असेल. तुम्ही वयाच्या 35,40,45,50,55,58 आणि 60व्या वर्षासाठी मॅच्युरिटी निवडू शकता.5 / 7पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार या पॉलिसीमध्ये कमीतकमी सम अश्योर्ड 20000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,00,000 रुपये आहे. अर्थात तुम्ही 20000 ते 50 लाख रुपयांदरम्यानचा विमा संतोष पॉलिसीअंतर्गत घेऊ शकता. तुम्ही दरमहा, तिमाही, सहामाही स्वरुपात या पॉलिसीचा प्रीमियम भरू शकता.6 / 7समजा वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही हा पोस्टल इन्शुरन्स प्लॅन घेताना 5,00,000 रुपयांच्या सम अश्योर्डची निवड केली आणि 60 व्या वर्षी मॅच्युरिटीचा पर्याय निवडला. अर्थात यामध्ये पॉलिसी टर्म 30 वर्षांची आणि कारण 30व्या वर्षी तुम्ही पॉलिसी घेतली आहे आणि वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युरिटी आहे. त्यामुळे 30 वर्ष तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल.7 / 7तुम्ही दरमहा प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडला तर दरमहा तुम्हाला 1332 रुपये भरावे लागतील, वार्षिक पर्याय निवडला तर 15,508 रुपये भरावे लागतील. 30 वर्षाच्या कालावधीत एकूण 4,55,51 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला 5,00,000 रुपये आणि बोनसचे 7,80,000 रुपये मिळतील. अशाप्रकारे एकूण 12,80,000 रुपये तुम्हाला मिळतील. या पॉलिसीत दरवर्षी बोनसची रक्कम जोडली जाते जी शेवटी मॅच्युरिटीवर देण्यात येते.