शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष दिव्यांनी उजळला गंगा घाट, देवदिवाळीला दिसला काशीचा असा थाट

By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 9:15 PM

1 / 9
देव दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, यावर्षी देवदिवाळीनिमित्त गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर लाखो दिवे पेटवण्यात आले होते.
2 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारीनंतर वाराणसीत आले होते. लॉकडाऊननंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आले होते. या दौऱ्यात मोदींनी ५० किमी प्रवास हवाई मार्गाने तर ४० किमी प्रवास रस्तेमार्गाने केला.
3 / 9
कार्तिक पौर्णिमेला वाराणसीमध्ये देवदिवाळीचे आयोजन हे शेकडो वर्षांपासून होत आले आहे. या दिवशी देवतांनी शिवशंकराच्या नगरीत दिवाळी साजरी केल्याची मान्यता आहे. म्हणून हिला देव दिवाळी म्हणतात.
4 / 9
आज काशी श्रद्धेच्या रंगात रंगलेली दिसून आली. मोदींनी आदच्या देवदिवाळी महोत्सवाचे औपचारिक उदघाटन केले. यावेळी मोदींनी मंदिरांच्या संकेतस्थळांचेही उदघाटन केले.
5 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर मोंदींनी कॉरिडॉर प्रोजेक्टचा आढावा घेतला. तसेच दीप दान केले.
6 / 9
देवदिवाळीनिमित्त वाराणसीत करण्यात आलेली दिव्यांची सुंदर आऱास.
7 / 9
दिव्यांच्या आराशीने उजळलेला गंगा घाट
8 / 9
वाराणसीमधील दीपोत्सवाचे एक विहंगम दृश्य
9 / 9
वाराणसीमधील गंगा घाट
टॅग्स :VaranasiवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश