शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना लसीची पहिली मानवी ट्रायल सुरू, 2 दिवसात 8 जणांना दिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 10:11 PM

1 / 11
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
2 / 11
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे.
3 / 11
Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.
4 / 11
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रोगोावर लस कधी येणार, याचीच चिंता सर्वांना लागली आहे. या सर्व नागरिकांसाठी खुशखबरी आहे.
5 / 11
बिहारच्या पाटना येथील एम्स रुग्णालयात कोविड 19 लसीची चाचणी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे मानवी जीवावर याची ट्रायल सुरू करण्यात आली आहे.
6 / 11
येथील एम्स रुग्णालयात गेल्या 2 दिवसांत 8 जणांना या लसीची चाचणी देण्यात आली आहे. एम्सचे प्रबंधक प्रभातकुमार सिंह यांनी संदर्भात माहिती दिली.
7 / 11
पहिल्या टप्प्यात सुरुवातीला 18 जणांना या लसीचा डोस देण्यात आला असून त्याचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनी येणार आहे.
8 / 11
या लसीची ट्रायल चाचणी 54 जणांवर करण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी म्हटले
9 / 11
कोरोनाच्या लसीची देशातील ही पहिलीच मानव ट्रायल आहे, पाटणा एम्समधून याची सुरुवात झाली आहे.
10 / 11
हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने या लसीची निर्मित्तीक केली असून पाटणा एम्ससह देशातील 12 वैद्यकीय संस्थामध्ये ही मानव ट्रायल होणार आहे
11 / 11
दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याBiharबिहारhospitalहॉस्पिटल