शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फी न भरल्याने शाळेतून लावलेला तगादा झाला नाही सहन, दहावीतील विद्यार्थिनीने गळफास लावून संपवले जीवन

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 3:20 PM

1 / 5
फी न भरल्याने शाळेतून लावण्यात आलेल्या तगाद्याला कंटाळून एका दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हैदराबाद येथील असून, मृत विद्यार्थिनीला फी न भरल्याने अन्य विद्यार्थ्यांसमोर कमीपणा देण्यात येत होता. त्यामुळे कंटाळून अखेर या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले.
2 / 5
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पीडित विद्यार्थिनी ही हैदराबादमधील नेरमडेट परिसरातील एका खासगी शाळेतील १०वीत शिकत होती. मात्र शाळेतून फी भरण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणण्यात येत होता. तसेच तिला शाळेतून काढण्याची धमकी देण्यात येत होती.
3 / 5
शाळेतील या त्रासामुळे कंटाळून अखेर या १६ वर्षीय तरुणीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये या मुलीच्या आईवडीलांची नोकरी सुटली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात होते.
4 / 5
शाळेतील ३५ हजार रुपये फी पैकी १५ हजार रुपये त्यांनी कसेबसे भरले होते. उर्वरित फी २० फेब्रुवारीपर्यंत भरण्याचे ठरले होते. मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत फार सकारात्मकता दाखवली नाही. तसेच या तरुणीला शिक्षण घेण्यापासूनही रोखले.
5 / 5
पोलिसांना घटनास्थळावरून कुठल्याही प्रकारची सुसाइड नोट जप्त करण्यात आलेली नाही. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॅग्स :Suicideआत्महत्याSchoolशाळाTelanganaतेलंगणा