शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:13 IST

1 / 9
आर्थिक स्वार्थामुळे निर्माण झालेल्या आव्हानांनंतही, भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७.८% एवढा विकास दर गाठला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी नवी दिल्ली येथे 'सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले.
2 / 9
मोदी म्हणाले, आर्थिक स्वार्थामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, देशाने आर्थिक आघाडीवर मोठी प्रगती केली आहे. पंतप्रधानांचा स्पष्ट रोख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लादलेल्या टॅरिफ अथवा कराकडे होते.
3 / 9
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्थेने प्रत्येक अपेक्षा आणि अंदाजापेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. महत्वाचे म्हणजे, जगभरात आर्थिक चिंता आणि आर्थिक स्वार्थामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताने ७.८ टक्के एकवढी वाढ गाठली आहे.'
4 / 9
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पहिल्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पाद (GDP) 6.5 टक्क्यांच्या तुलनेत 7.8 टक्क्यांनी वाढला आहे. हा आकडा गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.3 टक्क्यांनी अधिक आहे.
5 / 9
पंतप्रधान म्हणाले, 'जीडीपीमधील ही वाढ प्रत्येक क्षेत्रात दिसून आली आहे. यात मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, अॅग्रीकल्चर, कन्स्ट्रक्शनसह अनेक सेक्टर्सचा समावेश आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे.'
6 / 9
आज भारत वेगाने पुढे जात आहे, यामुळे आपल्या सर्वांमध्ये, देशातील प्रत्येक नागरिकामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होत आहे. एवढेच नाही तर, यावरून, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा दृष्टीने भारताचा प्रवास निश्चित झाला आहे. हे स्पष्ट होते, असेही मोदी म्हणाले.
7 / 9
भारतावर संपूर्ण जगाचा विश्वास - सेमिकॉन इंडिया परिषदेत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास आहे आणि भारतासोबत सेमीकंडक्टर भविष्य बनवण्यासाठी तयार आहे. भारत महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेवर काम करत आहे आणि दुर्मिळ खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
8 / 9
या परिषदेत पंतप्रधानांनी देशात बनवलेली पहिली सेमीकंडक्टर चिप लाँच केली.' दरम्यान, 'तो दिवस दूर नाही, जेव्हा भारतात बनवलेली सर्वात लहान चिप जगात सर्वात मोठा बदल घडवेल,' असेही मोदी म्हणाले.
9 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी...
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्धAmericaअमेरिकाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था