Diwali: दिवाळीत फटाके फोडताना भाजल्यास घाबरू नका, त्वरित करा हे घरगुती उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:48 IST
1 / 6दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाकेही फोडले जातात. मात्र अनेकदा फटाके फोडताना अपघात होऊन भाजल्याच्या अनेक घटना घडत असतात. जळाल्यावर, भाजल्यावर नेहमी लोक घाबरतात आणि त्वरित रुग्णालयात धाव घेतात. 2 / 6जळालेल्या भागी एवढी आग होते की, काय करावं ते सुचत नाही. आज आपण जाणून घेऊयात की दिवाळीत फटाके फोडताना जर जळाले किंवा भाजले तर कुठले घरगुती उपचार करता येतील त्याविषयी. 3 / 6जर फटाते फोडताना काही अपघात झाला आणि भाजल्यास घाबरू नका. सर्वप्रथम थंड पाणी घ्या आणि जळालेल्या जागी ओता. त्यानंतर जळालेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्याने जळजळीपासून दिलासा मिळेल. काही जण जळालेल्या जागेवर बर्फ लावतात. मात्र असं करू नये, असं केल्यास रक्ताची गुठळी होण्याची भीती असते.4 / 6फटाक्यामुळे जळालेल्या जागी तुळशीचा रस लावू शकता. तुळशीचा रस थंडावा देईल, त्यामुळे त्या भागाची होणारी आग कमी होईल. तसेच तुळशीच्या रसाच्या मदतीने जळाल्याची खूणही शरीरावर राहणार नाही. 5 / 6फटाक्याने जळालेल्या ठिकाणी नारळाचे तेल लावणे उपयुक्त ठरते. भाजल्यानंतर नारळाचे तेल हे उत्तम प्राथमिक उपचार ठरू शकतात. 6 / 6दिवाळीमध्ये फटाके फोडताना भाजल्याच कोरफड ही सुद्धा प्रथमोपचारांसाठी उपयुक्त ठरू शकते. फर्स्ट डिग्री बर्नसाठी कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात.ते तुम्हाला संसर्गापासून वाचवतात.