Highway: 'हायवे, एक्सप्रेस वे अन् ग्रीनफील्ड' महामार्गातील फरक, घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 16:44 IST
1 / 9केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे देशभरात मोठमोठे रस्ते बनवत आहेत. त्यामध्ये, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड रस्तेमार्गांचं समावेश आहे. 2 / 9 गेल्या काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबई ते दिल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तर, राज्य सरकारच्या समृद्धी महामार्गाचेही नोव्हेंबर महिन्यात लोकार्पण झाले आहे. 3 / 9रस्ते बांधणीसाठी, महामार्गासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, असे गडकरी सार्वजनिक कार्यक्रमात जाहीरपणे सांगतात. विशेष म्हणजे या रस्ते बांधणीसाठी ते निधीही देतात.4 / 9आता, चेन्नई-सूरत या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी, सध्या जमिन संपादनाचं कामही सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध असला तरी हे काम सुरूच आहे.5 / 9मात्र, राज्यात, देशात होत असलेल्या या महामार्गांतील तीन प्रकारचा नेमका फरक काय. म्हणजे, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड वे म्हणजे नेमकं काय असतं. 6 / 9हायवे म्हणजे महामार्गाला अनेक रस्ते जोडले जातात, किंवा तेथून पुढे कनेक्ट होत असतात. त्यामुळे, बहुमार्गीय रस्त्यांना जोडणारा वे म्हणजे हायवे असं म्हणतात येईल. 7 / 9एक्सप्रेस वे मार्गावर पोहोचण्यासाठी कमी रस्ते असतात. म्हणजेच, एक्सप्रेस वेवर तुम्हाला जायचं असेल तर त्याचं निश्चित मार्ग असतो, त्याच मार्गावरुन तुम्हाला एक्सप्रेस वे गाठता येतो. 8 / 9ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे थोडासा वेगळा असतो. कारण, हा एक्सप्रेस वे शहरापासून दूर, नागरीकरण वस्तीपासून लांब, शेती किंवा पडीक जमिनींजवळून निघतो. या महामार्गासाठी जमिन सहज उपलब्ध होते, आणि रस्ता लवकर बनतो. 9 / 9 ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ला ग्रीन कॉरिडोरही म्हटलं जातं. ज्याठिकाणी यापूर्वी रस्ता नाही, तेथूनच ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार केला जातो. तर, ब्राऊडफील्ड एक्सप्रेस वे म्हणजे सध्याच्या महामार्गाचे रुंदीकरण, विकसित केले जाते.