1 / 10लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपा उमेदवार बांसुरी स्वराज यांनी मंगळवारी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.2 / 10बांसुरी स्वराज यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. बांसुरी यांच्याकडे 11.27 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे.3 / 10निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बांसुरी स्वराज यांचे राजधानी दिल्लीत तीन फ्लॅट आहेत. दोन फ्लॅट जंतर मंतर येथे आणि एक हेली रोड, दिल्ली येथे आहे. 4 / 10गाड्यांबद्दल बोलायचं तर बांसुरी यांच्याकडे दोन गाड्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी खरेदी केलेल्या मर्सिडीज बेंझचा समावेश आहे.5 / 10या कारची किंमत 84 लाख रुपये आहे, तर अन्य कार टोयोटाची किंमत 15 लाख रुपये आहे. बांसुरी स्वराज यांच्याकडे हरियाणातील पलवलमध्ये 99.34 लाख रुपयांची संपत्ती आहे. 6 / 102022-23 च्या आयकर रिटर्नमध्ये बांसुरी स्वराज यांचं उत्पन्न 68.28 लाख रुपये असल्याचं घोषित केलं आहे.7 / 10बांसुरी यांनी यूकेच्या वारविक विद्यापीठातून कला विषयात पदवी (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी लंडनमधून डिप्लोमाही केला आहे.8 / 10बांसुरी स्वराज यांनी 2007 साली लंडनच्या इन्स ऑफ इनर टेंपलमधून 'बॅरिस्टर-एट-लॉ' ही पदवी मिळवली. 2009 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून 'मास्टर ऑफ स्टडीज' पूर्ण केलं.9 / 10प्रतिज्ञापत्रात, बांसुरी स्वराज यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा वकील म्हणून मिळणारी फी आणि बँकेतील ठेवींचे व्याज आहे. 10 / 10प्रतिज्ञापत्रात, बांसुरी स्वराज यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा वकील म्हणून मिळणारी फी आणि बँकेतील ठेवींचे व्याज आहे.