शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भारतात कोरोनाचा उद्रेक का झाला नाही? गुगलने सांगितले 'खरे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 07:28 IST

1 / 11
मात्र, आज गुगुलने जी आकडेवारी जाहीर केली त्यावरून भारतीयांनीच कोरोनाच्या प्रसाराला रोखल्याचे समोर येत आहे. दुबईहून आलेले कुटुंबीय मुंबईत उतरून कॅबने पुण्याला गेले होते. त्या कॅबचालकालाही कोरोना झाला होता. तर ती कॅब नंतर वापरणाऱ्या वृद्धाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. भारतीयांनी या कोरोनाच्या साखळीवरच घाव घालायला चक्क ८ मार्च पासून सुरुवात केली होती.
2 / 11
यामुळे शहरात असलेला कोरोना गावांमध्ये आणि दूरदूरच्या राज्यांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त होत होती. मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी आलेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरली होती. तसेच लॉकडाऊनमध्ये थाळी बाजविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनालाही अनेकांनी रस्त्यावर उतरून थाळी वाजवत सामाजिक अंतर ठेवण्याच्या उद्देशाला हरताळ फासला होता.
3 / 11
कोरोना व्हायरसने देशात पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे. मात्र, अमेरिका, युरोपसारखी उद्रेकाची परिस्थिती आपल्याकडे उद्भवलेली नाही. राज्य सरकारे आणि केंद्र सरकारांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर केलेले लॉकडाऊन याला जबाबदार आहे. पण त्यापेक्षाही एक चांगली आणि धक्कादायक बाब गुगलने स्पष्ट केली आहे.
4 / 11
भारतात २४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर न पडण्याचे आणि आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक कामगार, मजूरांनी गावी जाण्यासाठी मिळेल ती वाहने, मिळेल त्या मार्गाने पायी जाण्याचा अट्टाहास केला. याची भीती होती.
5 / 11
गुगलने एक रिपोर्ट तयार केली आहे. ज्यामध्ये १६ फेब्रुवारी ते २९ मार्च पर्यंतचा डेटा आहे. महत्वाचे म्हणजे भारतात जादातर लोक अँड्रॉईड फोन वापरतात. यामुळे गुगल त्यांचे लोकोशन सारखे ट्रेस करत असते. शिवाय अनेक मोबाईल एकत्र आले तर त्याचे ट्रॅफिक जाम सारखे सूचनाही दाखविते. याचबरोबर मॉल, एखादे रेस्टॉरंट, अखादे दुकान यामध्ये तुम्ही किती वेळ होता याचेही गणित गुगल ठेवते. यावरून हा डेटा जारी करण्यात आला आहे.
6 / 11
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे भारतीयांनी ८ मार्चपासूनच एकमेकांपासून लांब राहण्यास सुरुवात केली होती. कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात केल्याने मोठ्या प्रमाणावर लोक ऑफिसमध्ये एकत्र येण्यास कमी होऊ लागले. ही संख्या ४७ टक्क्यांनी घटली. यामुळे घरातचा राहणाऱ्या लोकांची संख्या २९ मार्च पर्यंत २२ टक्क्यांनी वाढली.
7 / 11
याच काळात लोकांनी शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, थीम पार्क, म्युझिअम, लायब्ररी, थिएटरमध्ये न जाण्यास सुरुवात केली होती. ही संख्या या काळात ७७ टकक्यांनी कमी झाली होती. याचा मोठा परिणाम कोरोना न पसरण्यावर झाला.
8 / 11
अशाप्रकारे किराणा बाजार, फूड वेअरहाउस, कृषी बाजार, मेडिकल सारख्या ठिकाणीही लोकांची ये-जा ६५ टक्क्यांनी घटली. तसेच पार्क, डॉग पार्क, सार्वजनिक गार्डनमध्येही लोकांची रेलचेल ५७ टक्क्यांनी घटली.
9 / 11
यानंतर बस, लोकल, रेल्वे स्थानक सारख्या सार्वजनिक ठिकाणीही लोकांनी जाणे बंद केले. ८ मार्च पासूनच लोकांची घट नोंदविली गेली आहे. हेच मूळ कारण आहे.
10 / 11
या सगळ्याचा परिणाम असा झाला की, कोरोनाचा अज्ञात असलेला पेशंट लोकांच्या संपर्कात आला नाही.
11 / 11
लोकल, बसमध्येही लोक एकमेकांकडे संशयाच्या नजरेतून पाहू लागले होते. कोणी शिंकला तरीही त्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या. हे अती सावधगिरीचे लक्षणच भारताचा आतापर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखू शकले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगल