शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:09 AM

1 / 8
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही गंभीर संकट उभे राहिले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या अकरा लाखांच्या वर गेली आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन अशा उपायांनंतरही कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही.
2 / 8
अशा परिस्थितीत देशातील जनतेवरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी या विषाणूवरील लस लवकरात लवकर तयार होणे आवश्यक बनले आहे.
3 / 8
कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी सध्या जगातील अनेक देशांमध्ये शेकडो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. दरम्यान भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, सात भारतीय कंपन्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत. या कंपन्या पुढील प्रमाणे...
4 / 8
भारत बायोटेक या औषध निर्माता कंपनीने कोव्हॅक्सिन नावाची लस विकसित केली आहे. या लसीची वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी या कंपनीला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात त्याची वैद्यकीय चाचणी सुरू झाली.
5 / 8
सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनीनेसुद्धा या वर्षअखेरीपर्यंत कोरोनाची लस विकसित करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या आम्ही एस्ट्राजेनेका अॉक्सफर्ड व्हँक्सिनवर काम सुरू आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी सुरू आहे. अॉगस्टमध्ये याची चाचणी भारतात सुरू होईल. दरम्यान, सध्याच्या संशोधनानुसार यावर्षअखेरीपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता सीरम इंस्टीट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केली.
6 / 8
जायडस कॅडिला या फार्मा कंपनीनेसुद्धा जायको व्ही-डी या नावाने विकसित केलेल्या लसीची चाचणी सुरू केली आहे. ही वैद्यकीय चाचणी सात महिन्यांत पूर्ण होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.
7 / 8
याशिवाय पेनेसिया बायोटेक, इंडियन इम्युनोलॉजिकल्स, मिनव्हँक्स, बायोलॉजिकल ई या कंपन्यासुद्धा कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी संशोधन करत आहेत.
8 / 8
लसीची चाचणी ही चार टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात प्री-क्लीनिकल चाचणी होते. यामध्ये प्राण्यांवर परीक्षण केले जाते. त्यातून लस किती सुरक्षित आहे याची चाचपणी होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी होते. मग दुसऱ्या टप्प्यातील चाचणी थोड्या मोठ्या समुहावर चाचणी केली जाते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात काही हजार लोकांना लस देऊन त्यांचे निरीक्षण केले जाते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicinesऔषधं